शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

आता रेल्वे तिकिटांचे बुकिंग भीम अ‍ॅपने शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:19 IST

कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने भीम अ‍ॅपचा वापर सुरू केला असून आता प्रवासी युपीआय (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) किंवा भीम अ‍ॅपचा वापर करुन आरक्षणाचे आणि अनारक्षित तिकीट काढू शकतात.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधा : कॅशलेस व्यवहारासाठी आणखी एक पर्याय

आॅनलाईन लोकमतनागपूर : कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने भीम अ‍ॅपचा वापर सुरू केला असून आता प्रवासी युपीआय (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) किंवा भीम अ‍ॅपचा वापर करुन आरक्षणाचे आणि अनारक्षित तिकीट काढू शकतात.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र यांनी नागपूर विभागात ही सुविधा सुरू केली. उल्लेखनीय बाब म्हणजे देशातील सर्वच रेल्वेस्थानकांवर यापूर्वीच ‘पीओएस’ (पॉईंट आॅफ सेल) मशीनद्वारे डेबिट किंवा क्रेडिट कार्डने तिकीटाची रक्कम देण्याची व्यवस्था सुरू केली आहे. यात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आधी तीन महिने भीम अ‍ॅपपासून तिकीट बुक केल्यास त्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. यामुळे प्रवाशांजवळ कॅशलेस तिकीट काढण्याचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यासाठी प्रवाशांना तिकीट काऊंटरवर बुकिंगच्या वेळी प्रवासाची माहिती आणि भीम अ‍ॅपची माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर आॅपरेटर द्वारा संगणकात माहिती फीड केल्यानंतर प्रवाशाच्या मोबाईलवर तिकीट बुकिंगसाठी एक मेसेज येईल. प्रवाशाने पुष्टी केल्यानंतर बँकेच्या खात्यातून तिकिटाच्या बुकिंगची रक्कम कपात होईल. ही प्रक्रिया पूर्ण होताच तिकीट काऊंटरवरील कर्मचारी तिकिटाची प्रिंट आऊट प्रवाशाला देईल.

 

 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीticketतिकिट