शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आता नागपूर रेल्वेस्थानकावर होईल कोणत्याही हॉटेलची बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 22:20 IST

रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशांना नागपुरातील कोणत्याही हॉटेलमध्ये खोली घेण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधा : रेल्वे प्रशासनाला मिळणार महसूल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाहेरगावावरून आलेल्या प्रवाशांना आता नागपूर शहरात राहण्यासाठी हॉटेलचा शोध घेण्याची गरज उरली नाही. रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशांना नागपुरातील कोणत्याही हॉटेलमध्ये खोली घेण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली असून प्रवाशांना २४ तास ही सुविधा रेल्वेस्थानकावर उपलब्ध राहणार आहे.प्रवाशांना सुविधा पुरविण्यासाठी तसेच महसुलात भर घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नागपूर रेल्वेस्थानकावर ओरवेल स्टेज प्रायव्हेट लिमिटेडसोबत या अभिनव योजनेचा शुभारंभ केला आहे असून ओयो या संघटनेच्या माध्यमातून रुमचे बुकिंग करता येईल. त्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर ‘टुरिस्ट असिस्टंट बूथ’ची स्थापना करण्यात आली आहे. हे बूथ रेल्वेस्थानकावर २४ तास प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू राहणार आहे. येथे प्रवाशांना आपल्या आवडीच्या हॉटेलची खोली बुक करता येणार आहे. रेल्वे बोर्डाच्या धोरणानुसार प्रवाशांच्या सुविधेसाठी राष्ट्रीय ट्रान्सपोर्टर सोबत अग्रगण्य हॉटेलशी करार करण्यात आला आहे. यात नागपूर रेल्वेस्थानकावर दरवर्षी २५ वर्ग फुटाची जागा किरायाने देण्यात येणार असून त्यासाठी रेल्वेला वर्षभरात पाच लाखाचे उत्पन्न मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आतापर्यंतचा हा पहिला प्रस्ताव आहे. विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सोमेश कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या उपस्थितीत या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम सहायक वाणिज्य व्यवस्थापक एच. के. बेहरा, विजय थुल यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य निरीक्षक तारा प्रसाद यांच्या निरीक्षणात सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरpassengerप्रवासी