शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आता १७ ऑगस्टपासून नागपूर विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 23:47 IST

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या घोळामुळे शैक्षणिक सत्राची सुरुवात लांबली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या वर्षासाठीचे शैक्षणिक कॅलेंडर घोषित केले होते व १ ऑगस्टपासून विषम सत्र सुरू होणार होते. परंतु आता विद्यापीठाने यात सुधारणा केली असून १७ ऑगस्टपासून विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे२०२०-२१ च्या शैक्षणिक कॅलेंडरमध्ये सुधारणा : सत्रावर ‘कोरोना’चे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या घोळामुळे शैक्षणिक सत्राची सुरुवात लांबली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या वर्षासाठीचे शैक्षणिक कॅलेंडर घोषित केले होते व १ ऑगस्टपासून विषम सत्र सुरू होणार होते. परंतु आता विद्यापीठाने यात सुधारणा केली असून १७ ऑगस्टपासून विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू करण्यात येणार आहे.दरवर्षी शैक्षणिक सत्राची सुरुवात १५ जूनपासून होते. यंदा मात्र १ ऑगस्टपासून शैक्षणिक सत्राची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २४ डिसेंबरपर्यंत वर्ग चालतील असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार पदव्युत्तर विभाग व महाविद्यालयांनी ‘ऑनलाईन’ वर्ग घेण्यासंदर्भात तयारीदेखील सुरु केली होती. मात्र २८ जुलै रोजी विद्यापीठाच्या विद्या परिषदेची सभा झाली व यात शैक्षणिक सत्र १७ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय झाला. त्या अनुषंगाने शुक्रवारी विद्यापीठाने यासंदर्भात घोषणा केली. हे सत्र कधीपर्यंत चालेल हे मात्र शुद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आलेले नाही.सुमारे दोन महिन्याच्या विलंबाने सत्र सुरू होणार आहे. या कालावधीची भरपाई विद्यापीठाच्या दिवाळी, हिवाळी व उन्हाळी सुट्या कमी करुन करण्यात येणार आहे. यावर्षी दिवाळीच्या सुट्या एक महिन्यांऐवजी एकाच आठवड्याच्या असतील तर हिवाळी सुट्या २० दिवसांच्या व उन्हाळी सुट्या एका महिन्याच्या असतील.अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हानसत्र प्रणालीनुसार महाविद्यालयांना डिसेंबर महिन्यापर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. युजीसीच्या नियमांनुसार सेमिस्टर सत्रात किमान ९० दिवसांचे शैक्षणिक सत्र व्हायला हवे. मात्र ‘कोरोना’मुळे महाविद्यालये उशिरा सुरू झाली किंवा विद्यार्थी उशिरा आले तर सत्र कसे पूर्ण होणार हादेखील एक प्रश्नच आहे. ग्रामीण भागात ‘ऑनलाईन’ वर्ग घेण्यास अडचणी येऊ शकतात.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठEducationशिक्षण