शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या कुख्यात नव्वाला मिळाली जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:31 IST

दक्षिण नागपुरातील चर्चित मारुती नव्वा याला फोनवर जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने दक्षिण नागपुरातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. मारुतीने यासंदर्भात नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देगुन्हे जगतात खळबळ : नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण नागपुरातील चर्चित मारुती नव्वा याला फोनवर जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने दक्षिण नागपुरातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. मारुतीने यासंदर्भात नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.नव्वाच्या तक्रारीनुसार त्याला मंगळवारी रात्री पाचपावलीतील पवन मोरयानी आणि मानकापूर येथील करीम लाला याने फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी गिट्टीखदान येथील सुमित ठाकूरचे नाव घेऊन त्यालाही पाहून घेण्याची धमकी दिली. नव्वाने बुधवारी सकाळी नंदनवन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी पवन आणि करीम लालाविरुद्ध धमकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे.पवन मोमीनपुरा येथील इप्पा गँगशी जुळलेला आहे. या गँगने एक महिन्यापूर्वी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला होता. या प्रकरणात पवनला अटक करण्यात आली होती. तो नुकताच जामिनावर सुटला आहे. या हल्ल्याचा सूत्रधार इप्पा आणि त्याच्या साथीदाराला पोलीस एक महिन्यानंतरही शोधू शकलेले नाही. करीम लाला हा मानकापूर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार आहे. काही दिवसांपूर्वीच मानकापूर चौकात त्याच्या इशाऱ्यावरूनच हल्ला करण्यात आला होता. बोरगाव दिनशॉ फॅक्टरीजवळ गोळीबार करणाऱ्या पंकज धोटेलाही त्याचा आश्रय मिळालेला आहे. पंकजने ज्या युवकावर गोळीबार केला होता तो सुमित ठाकूरचा साथीदार होता. यामुळे गुन्हेगारी जगतात या नवीन धमकीमुळे खळबळ उडाली आहे. पवन मोरयानी व करीम लाला अनेक वर्षांपासून गुन्हेगारी जगतात सक्रिय आहेत. ते जुगार अड्डा चालवण्यासाठी चर्चेत असतात. यानंतरही पोलीस त्यांच्याविरुद्ध कारवाई करीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसCrimeगुन्हा