लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मेयोत दाखल करण्यात आलेला कुख्यात गुंड संतोष आंबेकर याला मध्यवर्ती कारागृहात उघडलेल्या इस्पितळात दाखल करण्यात आले.कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आणि प्रकृती जास्त बिघडल्याची तक्रार केल्यामुळे गेल्या आठवड्यात आंबेकरला मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तो पळून जाण्याचा धोका असल्यामुळे त्याच्याभोवती आणि मेयोच्या सभोवताल मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. आंबेकरच्या बंदोबस्तात अनेक पोलिस गुंतल्यामुळे पोलीस दलावर अतिरिक्त ताण आला होता. त्यामुळे प्रकृती ठीक असेल तर त्याला तातडीने कारागृहातील इस्पितळात घेऊन जावे, तेथेच त्याचे उपचार करावे, अशी विनंती पोलिसांनी केली होती. डॉक्टरांनी आंबेकरची प्रकृती बरी असल्याचा शनिवारी निर्वाळा दिल्यामुळे आंबेकरला मध्यवर्ती कारागृहात तयार करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.
नागपूरच्या कुख्यात आंबेकरची जेलवापसी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 22:54 IST