शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात आंबेकरच्या भाच्याला मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:01 IST

उपराजधानीतील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा भाचा शैलेश ज्ञानेश्वर केदार (वय ३२) याला सहा सशस्त्र गुंडांनी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. त्याच्या गल्ल्यातील १५ हजार रुपये, सोन्याची साखळी आणि चांदीचे हातकडेही हिसकावून नेले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली.

ठळक मुद्देनंदनवनमध्ये सशस्त्र गुंडांचा हैदोस : रॉडने मारले, रोख आणि सोनसाखळी हिसकावून नेली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा भाचा शैलेश ज्ञानेश्वर केदार (वय ३२) याला सहा सशस्त्र गुंडांनी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. त्याच्या गल्ल्यातील १५ हजार रुपये, सोन्याची साखळी आणि चांदीचे हातकडेही हिसकावून नेले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली.शैलेश केदार याने पोलिसांना तक्रार नोंदविताना दिलेल्या माहितीनुसार, त्याने काही महिन्यांपूर्वी नंदनवनमधील व्यंकटेश कॉलनीत टी स्टॉल लावला. त्याच्या टी स्टॉलवर नेहमी ग्राहकांची गर्दी असते. रविवारी रात्री शैलेश त्याचे मित्र रवी हेडावू आणि आदर्श सातपुते सोबत ग्राहकांना चहा व मॅगी बनवून देत असताना आरोपी आकिब ऊर्फ सोनू, गणेश, भोला, पीयूष आणि त्याचे दोन साथीदार आले. ते सर्व चहा प्यायले. त्यानंतर शैलेशने त्यांना चहाचे पैसे मागितले असता आरोपींनी शैलेशला ‘तू यहां कबसे ठेला लगाता, हम यहा के दादा है, हमारे आदमी से कभी पैसे नही लेने का,’ असे म्हणत आरोपीने लोखंडी रॉडने शैलेशला मारहाण केली. एवढेच नव्हे तर तलवार काढून शैलेशला जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळी तसेच हातातील चांदीचे कडे आणि गल्ल्यातील १४,८०० रुपये हिसकावून घेतले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. उपचार करून घेतल्यानंतर शैलेशने नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर कुणालाही अटक झाली नव्हती. आरोपींचा शोध घेतला जात आहे.डॉन का भांजा अन् चहाटपरी...!नागपूरचा डॉन म्हणून कुख्यात असलेल्या संतोष आंबेकरच्या भाच्याचे नाव शैलेश केदारच असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. शैलेशने पोलिसांकडे तक्रार नोंदविताना आंबेकर आपला मामा असल्याचे सांगितल्याचे ठाणेदार विनायक चव्हाण यांनी लोकमतला सांगितले आहे. ही घटना खरी असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले आहे. मात्र, केदारने चहा टपारीसारखा १० - २० रुपये गोळा करणारा व्यवसाय सुरू करण्याची बाब खुद्द पोलिसांनाही पटेनाशी झाली आहे. त्यामुळे आम्ही सर्वच अँगल तपासत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडा