शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री रणजित देशमुख यांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 20:17 IST

माजी मंत्री आणि काँग्रेस नेते रणजित देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. देशमुख हे अध्यक्ष असलेल्या व्ही.एस.पी.एम अकँडमी आॅफ हायर एज्युकेशन या संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या  लता मंगेशकर हॉस्पिटलला सरकारने शैक्षणिक उपक्रमासाठी जागा लीजवर दिली होती. पण त्या जागेवर व्यावसायिक उपयोगासाठी गाळे काढण्यात आले आहेत. त्यामुळे ही जमीन शासनजमा का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी बजावली आहे.

ठळक मुद्दे लता मंगेशकर रुग्णालयाच्या जागेचा केला व्यावसायिक वापर : जमीन शासनजमा का करू नये ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी मंत्री आणि काँग्रेस नेते रणजित देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. देशमुख हे अध्यक्ष असलेल्या व्ही.एस.पी.एम अकँडमी आॅफ हायर एज्युकेशन या संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या  लता मंगेशकर हॉस्पिटलला सरकारने शैक्षणिक उपक्रमासाठी जागा लीजवर दिली होती. पण त्या जागेवर व्यावसायिक उपयोगासाठी गाळे काढण्यात आले आहेत. त्यामुळे ही जमीन शासनजमा का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी बजावली आहे.रणजित देशमुख यांनी आयडीबीआय बँकेचे कर्ज थकविल्यामुळे त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची टांगती तलवार आहे. आज, सोमवारी त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा इशारा यापूर्वीच बँकेने दिला आहे. यामुळे नामुष्की ओढवली असताना आता लीजवर घेतलेल्या सरकारी जागेचा व्यावसायिक उपयोग केल्याचे प्रकरण त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.रणजित देशमुख अध्यक्ष असलेल्या व्ही.एस.पी.एम संस्थेला सरकारने हिंगणा तालुक्यातील मौजा डिगडोह येथील सर्व्हे क्रमांक १२७/१ व १२७/५ अनुक्रमे आराजी १२.१७ हे.आर. व १५.०० हे. आर. अशी एकूण २७.१७ हेक्टर जमीन लीजवर दिली आहे. लता मंगेशकर हॉस्पिटलला सरकारने शैक्षणिक उपक्रमासाठी ही जागा लीजवर दिली होती. मात्र, शासनाची कुठलीही परवानगी न घेता या जागेवर गाळे बांधून त्याचा व्यावसायिक उपयोग करण्यात आला आहे. यामुळे शासकीय आदेश दिनांक १३/३/१९९० व दिनांक ७/१२/१९९१ मधील अट क्रमांक ३ चा भंग होत आहे. याची दखल जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी संस्थेच्या अध्यक्षांना नोटीस बजावली असून ही जागा का परत घेऊ नये, अशी विचारणा केली आहे. येत्या सात दिवसात याबाबत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सात दिवसांत खुलासा न केल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :Ranjit Deshmukhरणजित देशमुखcollectorतहसीलदार