शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची राज्य सरकारला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:15 IST

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची राज्य सरकारला नोटीस फायर ऑडिटचाही अहवाल मागवला, मृत बाळांच्या पालकांना पंतप्रधानांकडून प्रत्येकी दोन लाख लोकमत न्यूज ...

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची राज्य सरकारला नोटीस

फायर ऑडिटचाही अहवाल मागवला, मृत बाळांच्या पालकांना पंतप्रधानांकडून प्रत्येकी दोन लाख

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा/नागपूर : भंडारा जिल्हा रुग्णालयातील दहा बाळांच्या मृत्यूप्रकरणाची स्वयंस्फूर्तीने दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सोमवारी महाराष्ट्र सरकारला नोटीस जारी केली. राज्याचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांनी चार आठवड्यांत या घटनेचा तसेच राज्यभरातील रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा अहवाल सादर करायचा आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जळीतकांडात मरण पावलेल्या बाळांच्या पालकांना प्रत्येकी दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान घोषित केले. आगीतून वाचलेल्या बाळांच्या पालकांना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येतील. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी भंडाऱ्याचे जिल्हा रुग्णालय तसेच मृत बाळांच्या मातांची भेट घेतली.

चौकशी समितीचा अहवाल लांबणार

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्याप्रमाणे भंडारा अग्निकांडाचा चौकशी अहवाल तीन दिवसांत म्हणजे मंगळवारी सादर होण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सहा सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्याऐवजी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची नियुक्ती केल्यामुळे हा विलंब लागेल, असे सूत्रांनी सांगितले. हा चौकशी अहवाल आरोग्यविषयक असल्याने त्याला अधिक महत्त्व आहे. त्यातील निष्कर्षाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

पोलिसांकडून आकस्मिक मृत्यू नोंदवून तपास

भंडारा पोलीस ठाण्यात या अग्निकांड प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले. सहायक जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुनीता बढे यांच्यावतीने परिसेविका ज्योती शेखर भारसाकरे यांनी ही तक्रार दाखल केली. त्यावरून शनिवारी सायंकाळी ७.४६ वाजता आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला.

तान्हुल्यांच्या माता मानसिक धक्क्यात

अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांच्या माता मानसिक धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. त्या ओल्या बाळंतिणी असल्यामुळे त्यांची नियमित तपासणी आणि समुपदेशन करण्याचे निर्देश महिला व बाल कल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी संबंधितांना दिले. ॲड. ठाकूर यांनी सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रमोद खंडाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसुंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके उपस्थित होते. नंतर महिला व बाल कल्याण मंत्र्यांनी योगिता धुळसे (श्रीनगर) व वंदना सिडाम (रावणवाडी) यांची त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले.

‘लोकमत’च्या मोहिमेला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे बळ

भंडारा अग्निकांड प्रकरणी राज्य सरकारला नोटीस जारी करताना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गेले तीन दिवस ‘लोकमत’ चालवित असलेल्या मोहिमेचा उद्देश स्पष्टपणे उचलून धरला आहे. राज्याचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांनी या नोटीसीला चार आठवड्यांत उत्तर द्यायचे असून, राज्यभरातील सरकारी रूग्णालयांमध्ये नियमित फायर ऑडिट झाले का, कोणत्या त्रुटी आढळल्या व त्या दूर करण्याच्या प्रक्रियेत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली, ही माहिती सादर करण्याचे आयोगाचे आदेश आहेत. ही दुर्घटना राज्य सरकारच्या इस्पितळात घडली असल्याने नवजातांच्या जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. सरकार ती झटकू शकत नाही, असे मानवाधिकार आयोगाने राज्याला ठणकावले आहे. फायर ऑडिटच्याच मुद्यावर ‘ लोकमत’ बातमीदारांच्या नेटवर्कद्वारे गेले तीन दिवस राज्याच्या कानाकोपऱ्यातील वस्तुस्थिती तपासून पाहत आहे.

----------------------------------------

ट्विट...

महाराष्ट्रातील भंडारा इथल्या रुग्णालयातील भीषण आगीत प्राण गमावलेल्या प्रत्येक मुलाच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून दोन लाख रुपये, गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यायला पंतप्रधान @narendramodi यांनी मंजुरी दिली आहे.

- पंतप्रधान कार्यालय

-----------------------------------