शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धार्थविनायक काणे यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 21:09 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, माजी कुलसचिव पुरण मेश्राम व उपकुलसचिव (विद्या) अनिल हिरेखण यांच्याविरुद्ध भादंवीच्या कलम १२०-ब, १६६, १७७, २०१, ४०६, ४०९, ४७१ आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (क) व (ड) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यासाठी पत्रकारिता अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर या तिघांसह सीताबर्डी पोलीस निरीक्षकांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

ठळक मुद्देसत्र न्यायालय : एफआयआर नोंदविण्यासाठी तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, माजी कुलसचिव पुरण मेश्राम व उपकुलसचिव (विद्या) अनिल हिरेखण यांच्याविरुद्ध भादंवीच्या कलम १२०-ब, १६६, १७७, २०१, ४०६, ४०९, ४७१ आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (क) व (ड) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यासाठी पत्रकारिता अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर या तिघांसह सीताबर्डी पोलीस निरीक्षकांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणावर आता ३० मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.हिरेखण यांनी जुलै-२०१३ मध्ये सहायक कुलसचिवपदाकरिता अर्ज केला होता. परंतु, त्यांच्याकडे या पदाकरिता आवश्यक असलेला प्रशासकीय अनुभव नव्हता. त्यामुळे त्यांनी बनावट प्रमाणपत्र सादर केले. असे असताना पुरण मेश्राम यांचा समावेश असलेल्या छाननी समितीने त्यांचा अर्ज वैध ठरवला. त्यानंतर निवड समितीने या पदासाठी हिरेखण यांची निवड केली असे मिश्रा यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात वरील कलमांतर्गत एफआयआर नोंदवला जावा याकरिता मिश्रा यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, पण त्यांची दखल घेण्यात आली नाही. परिणामी, त्यांनी सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठSessions Courtसत्र न्यायालय