शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मुख्य माहिती आयुक्तांना हायकोर्टाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:47 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बेकायदेशीर कृतीसंदर्भातील प्रकरणात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आणि अमरावती, मुंबई व कोकण खंडपीठातील राज्य माहिती आयुक्त यांना नोटीस बजावून १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देबेकायदेशीर कृती केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बेकायदेशीर कृतीसंदर्भातील प्रकरणात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आणि अमरावती, मुंबई व कोकण खंडपीठातील राज्य माहिती आयुक्त यांना नोटीस बजावून                        १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.याविषयी खापरखेडा येथील श्रीराम सातपुते यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सातपुते यांनी मुकुटबन वनक्षेत्रामध्ये उत्खननासाठी एका खासगी व्यक्तीला देण्यात आलेल्या कार्यादेशाविषयी माहिती मागितली होती. त्यावर आधी जन माहिती अधिकारी व त्यानंतर जन अपिलीय अधिकारी यांनी कायद्याने ठरवून दिलेल्या मुदतीत कार्यवाही केली नाही. त्यामुळे त्यांनी राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठात द्वितीय अपील दाखल केले. नागपूर खंडपीठाने द्वितीय अपील निकाली काढून प्रथम अपिलावर कायद्यानुसार निर्णय देण्याचा जन अपिलीय अधिकाऱ्याला आदेश दिला. १४ फेब्रुवारी २०१४ रोजी जन अपिलीय अधिकाऱ्याने सातपुते यांनी मागितलेली माहिती देण्यात यावी, असे जन माहिती अधिकाऱ्याला निर्देश दिले तर, जन माहिती अधिकाऱ्याने २० फेब्रुवारी २०१४ रोजी संबंधित माहिती उपलब्ध नसल्याचे सातपुते यांना कळवले. त्यानंतर मुख्य राज्य माहिती आयुक्तांनी विविध निर्णयांवर पुनर्विचार करण्याची व त्यासाठी नवीन खंडपीठ स्थापन करण्याची बेकायदेशीर कृती केली, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर व अ‍ॅड. रोहन मालविया यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय