शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विकास मंडळावरून राज्यपाल, गृहसचिवांना नाेटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 22:38 IST

Development Board issue विदर्भ वैधानिक विकास मंडळासह इतर विकास मंडळांच्या पुनर्गठनाबाबत निर्णय हाेत नसल्याने न्यायालयाने राज्यपाल तसेच राज्याचे प्रधान सचिव आणि केंद्रीय गृह सचिवांना नाेटीस बजावली आहे.

ठळक मुद्देन्यायालयात राज्यपालांच्या निर्णयक्षमतेवर विदर्भवाद्यांचा आक्षेप : राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : विदर्भ वैधानिक विकास मंडळासह इतर विकास मंडळांच्या पुनर्गठनाबाबत निर्णय हाेत नसल्याने न्यायालयाने राज्यपाल तसेच राज्याचे प्रधान सचिव आणि केंद्रीय गृह सचिवांना नाेटीस बजावली आहे. विदर्भवाद्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तिन्ही संस्थात्मक प्रतिनिधींना दाेन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

विदर्भवादी नितीन राेंघे व विदर्भ विकास मंडळाचे माजी सदस्य डाॅ. कपिल चांद्रायण यांनी ही याचिका दाखल केली हाेती. त्यावर गुरुवारी न्या. एस.बी. शुक्रे व न्या. ए.जी. घराेटे यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. याचिकाकर्त्यांकडून ॲड. श्रीहरी अणे व ॲड. अक्षय सुदामे यांनी बाजू मांडली. याबाबत डाॅ. चांद्रायण यांनी सांगितले, विकास मंडळाबाबत निर्णय घेण्याचा राज्य शासनाला संविधानिक अधिकार नाही. घटनेच्या ३७१(२) नुसार राज्यपालांना निर्णय घेण्याचा विशेष अधिकार आहे. असे असताना राज्य मंत्रिमंडळाचे निर्देश नसल्यामुळे विकास मंडळाचा निर्णय खाेळंबला आहे. राज्य शासनाला अधिकार नसताना उपमुख्यमंत्र्यांनी १२ नामनिर्देशित सदस्यांच्या नावांना राज्यपालांनी मंजुरी दिल्यास आम्ही विकास मंडळाला परवानगी देऊ, असे वक्तव्य केले. विदर्भाच्या अधिकाराबाबत अशी साैदेबाजी खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका चांद्रायण यांनी मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयVidarbha Development Boardविदर्भ वैधानिक विकास मंडळ