शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्ण मालती पाठक हत्या प्रकरणी चौघांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:01 IST

प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन रुग्णांचा गळा आवळून हत्या झाल्याच्या प्रकरणातील दोषी कोण, हा प्रश्न १५ महिने उलटूनही अनुत्तरित आहे. परंतु, यातील एका प्रकरणात आरोग्य उपसंचालक कार्यालयाने आता मनोरुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांना हत्येप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देदोषी कोण ? १५ महिने उलटूनही प्रश्न अनुत्तरित

आॅनलाईन लोकमतनागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन रुग्णांचा गळा आवळून हत्या झाल्याच्या प्रकरणातील दोषी कोण, हा प्रश्न १५ महिने उलटूनही अनुत्तरित आहे. परंतु, यातील एका प्रकरणात आरोग्य उपसंचालक कार्यालयाने आता मनोरुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांना हत्येप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या ‘स्किझोफ्रेनिया’ची रुग्ण मालती पाठक (६०) यांचा मृत्यू ६ आॅक्टोबर २०१६ रोजी त्यांचाच वॉर्डातच झाला. पाठक यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर त्यांची गळा दाबून हत्या झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १२ फेब्रुवारीच्या अंकात ‘पुन्हा एका मनोरुग्णाची गळा आवळून हत्या’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. यापूर्वी, १७ सप्टेंबर २०१६ रोजी जयंत नेरकर (४४) या मनोरुग्णाचीही गळा आवळून हत्या झाल्याचे वृत्त सर्वात आधी ‘लोकमत’ने प्रसिद्ध करून मनोरुग्णालयाचा गैरकारभारच चव्हाट्यावर आणला होता. या दोन्ही प्रकरणाला घेऊन आरोग्य मंत्र्यांना गेल्या हिवाळी व उन्हाळी अधिवेशनात विविध प्रश्नांना सामोरे जावे लागले होते. मालती पाठक हत्या प्रकरणात तर आरोग्य विभागाकडून साधी चौकशी झाली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण अंगावर शेकणार म्हणून आरोग्य उपसंचालक कार्यालयाने सहायक संचालक (हिवताप) डॉ. मिलिंद गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली दोन महिन्यांपूर्वी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली. त्यात माताकचेरीच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी व तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांचा समावेश होता. डॉ. गणवीर समितीने चौकशीनंतरच्या अहवालात मनोरुग्ण पाठक यांच्या हत्याप्रकरणात चार जणांवर ठपका ठेवला होता. त्यानंतर हा अहवाल आरोग्य उपसंचालकांकडे सादर केला. आरोग्य उपसंचालकांनी हा अहवाल सहसंचालक (मनोरुग्णालय) डॉ. साधना तायडे यांच्याकडे पाठविला. त्यानंतर मात्र हा अहवाल डॉ. तायडे यांच्याकडे धूळखात पडून राहिला. नागपुरातील हिवाळी अधिवेशनात याप्रकरणी प्रश्न उपस्थित झाल्यास काहीतरी कारवाई केल्याचे दाखविण्यासाठी १५ डिसेंबर रोजी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने मनोरुग्णालयातील तीन परिचारिका व एक परिचर अशा चार जणांना पाठक यांच्या हत्येप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली. तब्बल १५ महिन्यानंतर कारणे दाखवा नोटीस मिळाल्याने कर्मचारीही आश्चर्यचकित झाले आहेत.

 

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयMurderखून