शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी शिक्षण संस्था सचिवांना अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 20:39 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सिहोरा, ता. तुमसर येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या व्यवस्थापनासंदर्भातील प्रकरणात शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे सचिव शेषराव खाडे यांना अवमानना नोटीस बजावली.

ठळक मुद्देहायकोर्ट : शाळा व्यवस्थापनाचा वाद

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सिहोरा, ता. तुमसर येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या व्यवस्थापनासंदर्भातील प्रकरणात शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे सचिव शेषराव खाडे यांना अवमानना नोटीस बजावली.खाडे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र शिवाजी शिक्षण संस्था सिहोराचे उपाध्यक्ष राजीवकुमार दलाल व सचिव संजीव दलाल यांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. यापूर्वी त्यांनी रिट याचिका दाखल करून महाराष्ट्र विद्यालयाच्या व्यवस्थापनावर दावा सांगितला होता. १७ एप्रिल २०१८ रोजी उच्च न्यायालयाने या प्रकरणातील तथ्यांसंदर्भात विविध वाद असल्याची बाब लक्षात घेता, ती याचिका निकाली काढून याचिकाकर्त्यांना कायद्यात उपलब्ध अन्य मार्गाचा अवलंब करण्याची मुभा दिली होती. असे असताना खाडे यांनीशिक्षणाधिकाऱ्यांसह अन्य विविध प्राधिकाऱ्यांना पत्र लिहून, महाराष्ट्र विद्यालय हे शिवाजी शिक्षण संस्थेचे असल्याचा व उच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्यात आल्याचा खोटा प्रचार केला. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने खाडे यांना अवमानना नोटीस बजावून, यावर २५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सी. एस. धाबे व अ‍ॅड. व्ही. ए. धाबे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयEducationशिक्षण