लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अनधिकृत गतिरोधकांसंदर्भातील प्रकरणात महापालिका आयुक्त व लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखणे यांना अवमानना नोटीस बजावली आहे.यासंदर्भात अॅड. आर.पी. जोशी यांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. जोशी यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीच्या एका याचिकेमध्ये महापालिकेने नागरिकांना अनधिकृत गतिरोधकांची तक्रार करता यावी याकरिता नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची ग्वाही दिली होती. तसेच, तक्रार मिळाल्यानंतर अनधिकृत गतिरोधक तत्काळ तोडण्यात येतील आणि अनधिकृत गतिरोधके शोधण्यासाठी शहराचे नियमित निरीक्षण केले जाईल असे सांगितले होते. परंतु, त्यापैकी काहीच झाले नाही. मनपाने अद्याप नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली नाही. १३ जानेवारी २०१७ व १३ आॅगस्ट २०१८ रोजी लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्तांना गजानननगर, सावरकरनगर, लक्ष्मीनगर इत्यादी भागातील अनधिकृत गतिरोधकांची माहिती दिली होती. त्यावरून काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने या प्रकरणावर नाताळाच्या सुट्यांनंतर पुढील सुनावणी निश्चित केली आहे. मनपाला तेव्हापर्यंत यावर उत्तर दाखल करायचे आहे.
नागपूर मनपा आयुक्तांना अवमानना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 20:26 IST
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अनधिकृत गतिरोधकांसंदर्भातील प्रकरणात महापालिका आयुक्त व लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखणे यांना अवमानना नोटीस बजावली आहे.
नागपूर मनपा आयुक्तांना अवमानना नोटीस
ठळक मुद्देहायकोर्ट : अनधिकृत गतिरोधकांचे प्रकरण