शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरातील १२ मोठ्या हॉटेलांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 21:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राहणार नाही. याचा विचार करता ...

ठळक मुद्देमनपाच्या आरोग्य विभागाची कारवाईओल्या कचऱ्यावर प्रक्रिया बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राहणार नाही. याचा विचार करता कचरा संकलनाचा नवा पॅटर्न राबविला जात आहे. १०० किलोहून अधिक कचरा निघणाऱ्या हॉटेल चालकांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवावयाचा आहे. तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आहे. परंतु वारंवार सूचना दिल्यानंतरही ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या शहरातील मोठ्या १२ हॉटेलांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीस बजावली आहे.यात हॉटेल प्राईड, हॉटेल तुली इम्पेरियल, हॉटेल मॅजेस्टीक मनोर, हॉटेल सेंटर पॉईंट, हॉटेल अशोक (लक्ष्मीनगर), हॉटेल अशोका माऊं ट रोड, हॉटेल रेडिसन ब्ल्यू, सी.पी.क्लब, गोंडवाना क्लब, वर्धा रोडवरील हॉटेल आदे , हॉटेल तुली इंटरनॅशनल व हॉटेल ट्रॅव्होटेल आदींचा समावेश असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे यांनी मंगळवारी दिली.शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामावरील मजुरांनी उघड्यावर शौचाला जाऊ नये यासाठी मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी मजुरांसाठी शौचालयाची व्यवस्था करावयाची आहे. अन्यथा कारवाई केली जाणार आहे. तसेच बांधकाम करताना रस्त्यावर रेती, विटा व अन्य सामुग्री ठेवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत होणाऱ्या सर्वेक्षणासोबतच आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.शासनाने याबाबतचा घनकचरा व्यवस्थापनाबाबतचा नवीन कायदा केला आहे. त्यानुसार नागरिकांना व व्यावसायिकांना ओला आणि सुका कचऱ्याची वर्गवारी करावी लागणार आहे. यासाठी दोन डस्टबिन ठेवावयाचे आहेत. १०० किलोहून अधिक कचरा संकलित होणाऱ्या हॉटेल व संस्थांना ओल्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावावयाची आहे.कंटेनरची संख्या वाढविणारशहरातील कचरा संकलनाची व्यवस्था अधिक बळकट करण्यात येईल. वर्षभरात नागरिकांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. शहरात १७ संकलन पॉईंट आहेत. येथील अवस्था बिकट आहे. यामुळे कंटेनरची संख्या वाढविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. त्यानुसार दोन -तीन दिवसात कंटेनरची संख्या वाढविण्यात येणार आहे. बाजारभागात अधिक कचरा निघतो. अशा ठिकाणी कॉम्पेक्टर लावण्यात येतील. कचरा संकलनाची नवीन यंत्रणा उभारली जात आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाhotelहॉटेल