शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नोंद घडामोडींची; सरकारी दवाखाने रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 15:09 IST

आज सरकारी रुग्णालयातील अवस्था आणि अनागोंदी बघितली तर सर्वसामान्यांचा देवच वाली आहे असे म्हणण्याची पाळी येते.

दिलीप तिखिलेनागपूर:आज सरकारी रुग्णालयातील अवस्था आणि अनागोंदी बघितली तर सर्वसामान्यांचा देवच वाली आहे असे म्हणण्याची पाळी येते. समाजात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो पण, हे डॉक्टरच जेव्हा रुग्णांना वाऱ्यावर सोडतात तेव्हा या गोरगरीब रुग्णांनी कुठे जावे आणि कुणाकडे बघावे असा प्रश्न पडतो. परवा नागपुरातील महानगरपालिकेच्या एका रुग्णालयातील जे धक्कादायक वास्तव उजेडात आले त्यामुळे सरकारी यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचे पितळ उघडे पडले.मनपाच्या डिक दवाखान्यात परवा लोकमतच्या चमूने स्टिंग ऑपरेशन केले त्यावेळी तेथील डॉक्टर सुटीवर होते. अर्थात डॉक्टर सुटीवर असणे हा गैरकारभाराचा भाग नाही. डॉक्टरही शेवटी माणूस आहे. त्याच्या गरजा असतातच. पण डॉक्टरच्या अनुपस्थितीत रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असेल तर तो केवळ गैरकारभारच नव्हे तर ते पाप म्हटले पाहिजे. डॉक्टर नसताना या दवाखान्यात चक्क एक फार्मासिस्ट रुग्णांना तपासून औषधी देत होता. आणि परिचारिका आपले मुख्य काम सोडून रुग्णांकडून शुल्क घेऊन पावत्या फाडण्यात व्यस्त होती. फार्र्मासिस्टचे काम केवळ डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधी रुग्णांना देणे एवढेच असते. त्याला डॉक्टर बनण्याचा अधिकार कुणी दिला? बरं असा प्रकार एखाद दुसऱ्या दिवशी घडतो असेही नाही. नेहमीच असे प्रकार घडत असल्याचे तेथे जाणाऱ्या रुग्णांनी सांगितले आहे. याला जबाबदार कोण? या दवाखान्यात अपुरे मनुष्यबळ आहे, असे सांगितले जाते, पण हे मनपाला माहित नाही का? डॉक्टर सुटीवर असेल तर त्याचे जागी दुसरा डॉक्टर देणे ही जबाबदारी मनपाच्या आरोग्य विभागाची नाही का? डॉक्टर नसतो तेव्हा फार्मासिस्टच डॉक्टर बनून रुग्णांच्या जीवाशी खेळतो हे काय या विभागाला ठाऊक नाही. पण ‘चलता है चलने दो’ म्हणून त्याकडे सतत डोळेझाक केली जाते.आपले लोकप्रतिनिधीही यासाठी तेवढेच जबाबदार आहेत. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या नातेवाईक रुग्णाला जर अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले असते तर त्या लोकप्रतिनिधीने मोठा राडा केला असता. किंबहुना नेत्याचा नातेवाईक येतो म्हटल्यावर दवाखान्यातील यंत्रणाही अलर्ट झाली असती आणि असा प्रसंगच उद्भवला नसता. पण या लोकप्रतिनिधींना किंवा त्यांच्या नातेवाईकांना अशा ‘फालतू’ सरकारी दवाखान्यात जाण्याची गरजच नसते. खरी गोम येथेच आहे. जोपर्यंत नेत्यांना लोकप्रतिनिधींना, बड्या सरकारी अधिकाऱ्यांना सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याचे बंधन घातले जात नाही तोपर्यंत या रुग्णालायांचा कारभारात सुधारणा होणे शक्य नाही.

टॅग्स :Medicalवैद्यकीय