शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

‘टॉप फाईव्ह’मध्ये नोटा : साडेसोळा हजार मतदारांची ‘नोटा’ला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 20:18 IST

विदर्भासह संपूर्ण देशात ‘मोदी’लाट असताना नागपूर जिल्ह्यात मात्र एक दोन नव्हेतर दोन्ही लोक सभा मतदारसंघ मिळून तब्बल १६ हजार ४९८मतदारांनी कुणालाही मतदान न करता नकारात्मक मताचा (नोटा) पर्याय निवडला. दोन्ही मतदारसंघाचा विचार करताना नोटाला मिळालेल्या मतांची संख्या ही ‘टॉप फाईव्ह’ मध्ये येणारी आहे. विशेष म्हणजे नागपूर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदारांनी अडीचपट नोटाचा वापर केला. २०१४ मध्ये ८२७६ मतदारांनी नोटाचा वापर केला होता. यावेळी मात्र ही संख्या दुप्पट झालेली दिसते. नोटाची ही वाढती संख्या लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेला चिंतन करायला लावणारी आहे.

ठळक मुद्दे२०१४ च्या तुलनेत दुप्पट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विदर्भासह संपूर्ण देशात ‘मोदी’लाट असताना नागपूर जिल्ह्यात मात्र एक दोन नव्हेतर दोन्ही लोक सभा मतदारसंघ मिळून तब्बल १६ हजार ४९८मतदारांनी कुणालाही मतदान न करता नकारात्मक मताचा (नोटा) पर्याय निवडला. दोन्ही मतदारसंघाचा विचार करताना नोटाला मिळालेल्या मतांची संख्या ही ‘टॉप फाईव्ह’ मध्ये येणारी आहे.विशेष म्हणजे नागपूर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदारांनी अडीचपट नोटाचा वापर केला. २०१४ मध्ये ८२७६ मतदारांनी नोटाचा वापर केला होता. यावेळी मात्र ही संख्या दुप्पट झालेली दिसते. नोटाची ही वाढती संख्या लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेला चिंतन करायला लावणारी आहे.निवडणूक आयोगाने मतदारांना नकारात्मक मतदानाचा पर्याय दिला असून त्याचा वापर यावेळीही लोक सभा निवडणुकीत क रण्यात आला आहे. रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी एक ही उमेदवार पसंतीचा नसेल तर त्यांना मत न देता नकारात्मक मतदान क रण्याची सोय प्रत्येक मतदान यंत्रात उपलब्ध क रून देण्यात आली होती. नागपूर मतदारसंघात ४५७८ मतदारांनी तर रामटेक मतदारसंघात तब्बल ११९२० मतदारांनी नोटा या पर्यायाचा वापर केला.नागपूर लोक सभेच्या रिंगणात ३० तर रामटेक लोक सभा मतदारसंघात १६ उमेदवार रिंगणात होते. यात दिग्गज उमेदवारांचा समावेश होता.मात्र या ४६ उमेदवारांमधून एक ही उमेदवार या मतदारांच्या पसंतीस उतरला नाही, असे नोटाची बटन दाबणाऱ्या मतदारांच्या संख्येवरू न वाटते. विशेष म्हणजे सुशिक्षित आणि शहरी भागात ‘नोटा’चा पर्याय अधिक होईल असा अंदाज व्यक्त क रण्यात येत होता. मात्र नागपूरच्या तुलनेत रामटेक मध्ये या पर्यायाचा वापर अधिक क रण्यात आल्याचे आक डेवारी सांगते. त्यामुळे ग्रामीण मतदारही अधिक जागृत आणि मंथन करणारा झाल्याचे दिसून येत आहे.असे झाले ‘नोटा’ मतदानमतदार संघ               २०१४               २०१९नागपूर                      ३४६०              ४५७८रामटेक                     ४८१६             ११९२०---------------------------------------------एकूण                      ८२७६              १६४९८पोस्टल बॅलेटमध्येही १६० नोटानिवडणूक ड्युटी लागलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच सैनिकांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सोय करून दिली जाते. मात्र, पोस्टल बॅलेटमध्येही १६० मतदारांनी नोटाचा वापर केला. नागपुरात ४० तर रामटेकमध्ये १२० मतदारांनी नोटाला पसंती दिली.संघानेही केले होते आवाहनराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘नोटा’ वापरू नका, असे आवाहन केले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमी सोहळ्यात तसेच दिल्ली येथील तीन दिवसीय व्याख्यानमालेतही या विषयाला हात घातला होता.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnagpur-pcनागपूरramtek-pcरामटेक