शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या समजामुळे योग्यवेळी उपचार न घेणे हा मनाच्या ‘हॅकिंग’चा प्रकार -डॉ. चंद्रशेखर मेश्राम 

By सुमेध वाघमार | Updated: March 10, 2024 23:10 IST

‘सायकॅट्रीक सोसायटी’चा अध्यक्षपदी डॉ. मनीष ठाकरे.

नागपूर : समाजात असणाºया चुकीच्या समजामुळे योग्य वेळी उपचार न घेणे हा मनाच्या ‘हॅकिंग’चाच एक प्रकार आहे, मेंदूचे आरोग्य जपण्यासाठी चांगले मन असणे गरजेचे आहे, त्याचा वापरही चांगला व्हायला हवा, असे मत प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी येथे व्यक्त केले. 

‘सायकॅट्रीक सोसायटी’ नागपूर शोखचे पदग्रहण सोहळा रविवारी एका खासगी हॉटेलमध्ये पार पडला. या सोहळ्यात डॉ. मेश्राम यांचा पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, प्रसिद्ध मानसिकरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांच्यासह सोसायटीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. मनीष ठाकरे, सचिव डॉ. सुधीर महाजन, माजी अध्यक्ष डॉ. निखिल पांडे व माजी सचिव डॉ.अभिषेक मामर्डे उपस्थित होते. 

-मानसिक उपचारांची वाढती गरजडॉ. गजभिये म्हणाले, समाजात वाढत असलेले व्यसन, सामाजिक बदल, वाढती स्पर्धा व त्यातून येणाºया ताणतणावामुळे मानसिक उपचारांची गरज वाढत आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांमधील आत्महत्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत आहे आणि हे टाळण्यासाठी मानसिक आरोग्याची जपवणूक गरजेची असल्याचेही ते म्हणाले. डॉ. भावे यांनी आत्महत्या थांबवण्यासाठी मनोरुग्णांचे पुनर्वसन ही समाजाची जबाबदारी असल्याचे मत मांडले.

-मेंदू, मन हे एकाच नाण्याच्या दोन बाजूडॉ. ठाकरे म्हणाले, मेंदू आणि मन हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मेंदूच्या आजारामुळे विविध प्रकारचे मानसिक लक्षणे दिसतात. उदा. डिमेंशियाचा आजारात झोपेचे आजार, डोकेदुखी. विविध तपासण्या करून देखील निदान न होणारे लक्षणे, हे मानसिक आजाराची असू शकतात.

-अशी आहे नवीन कार्यकारणीसोसायटीच्या नवीन कार्यकारणीत अध्यक्ष डॉ. मनीष ठाकरे, सचिव डॉ. महाजन, सहसचिव डॉ. श्रेयस मांगिया व डॉ. मौसम फिरके, कोषाध्यक्ष डॉ. आशिष कुथे तर सदस्य म्हणून डॉ. श्रीकांत निंभोरकर, डॉ. प्रांजली भगत, डॉ. लक्ष्मी, डॉ. मोनीषा दास, डॉ. रवी ढवळे, डॉ. कुमार कांबळे यांचा सहभाग आहे. संचालन डॉ. सोनाक्षी जारवा व डॉ. प्रांजली भगत यांनी केले. आभार डॉ. महाजन यांनी मानले.

टॅग्स :nagpurनागपूर