शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी खर्चूनही सिकलसेल निर्मूलन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 10:55 IST

भारतातील एकूण १२ राज्यात सिकलसेल आढळतो. महाराष्ट्रातील सुमारे १९ जिल्हे सिकलसेलने प्रभावित आहेत. विदर्भात याचे सुमारे १.२७ लाख रुग्ण तर २५ लाख वाहक आहेत.

ठळक मुद्देसिकलसेल जनजागृती सप्ताहसहा वर्षांपासून गर्भजल परीक्षण बंदशासनाच्या उदासीनतेचा फटका शासकीय रुग्णालयांना

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतातील एकूण १२ राज्यात सिकलसेल आढळतो. महाराष्ट्रातील सुमारे १९ जिल्हे सिकलसेलने प्रभावित आहेत. विदर्भात याचे सुमारे १.२७ लाख रुग्ण तर २५ लाख वाहक आहेत. यातही पूर्व विदर्भात याचे सर्वाधिक रुग्ण आहेत. परंतु याच भागातील मेयो, मेडिकल व डागा या शासकीय रुग्णालयांमध्ये गर्भजल परीक्षणच होत नाही. परिणामी, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणाºया आजाराच्या निर्मूलनासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करूनही विदर्भातील एकही जिल्हा सिकलसेलमुक्त झाला नाही.सिकलसेल हा गंभीर आजार आहे. मात्र सोयींबाबत शासन उदासीन असल्याने अनेक कुटुंब अडचणीत येत आहेत. सिकलसेलबाधित मातांच्या गर्भात वाढणाºया जीवाला सिकलसेल आहे का, याचे निदान बालरोगतज्ज्ञ डॉ. दीप्ती जैन यांच्या मार्गदर्शनात २००६मध्ये मेडिकलमध्ये सुरू झाले. २०१२ पर्यंत गर्भजल परीक्षण सुरू होते. परंतु डॉ. जैन यांची बदली होताच चाचणी बंद पडली. दरम्यानच्या काळात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) या चाचणीसाठी आवश्यक असलेले ‘पॉलिमर चेन रिअ‍ॅक्शन’ यंत्र उपलब्ध झाले. ही यंत्रणा हाताळण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ मात्र सरकारने उपलब्धच करून दिले नाही. त्यामुळे मेयोचा पॅथालॉजी विभाग आठवड्यातून एक दिवस म्हणजे मंगळवारी विविध रुग्णालयातून येणारे पाच ते सहा गर्भजलाचे नमुने गोळा करतो व चाचणीसाठी मुंबईला पाठवितो. दोन ते अडीच महिन्यांच्या अवकाशानंतर रुग्णाला चाचणीचा अहवाल मिळतो. रुग्ण विदर्भात असताना गर्भजल परीक्षण मुंबईत होत असल्याने शासनाची उदासीनता स्पष्ट होते.डागात दोन वर्षांपासून यंत्राची प्रतीक्षा२०१६च्या हिवाळी अधिवेशनात लागलेल्या तारांकित प्रश्नांमध्ये डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात सिकलसेल गर्भजल परीक्षणाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली होती. या केंद्रासाठी आवश्यक असलेली इमारतीची दुरुस्ती व यंत्रसामुग्रीसाठी ५७ लाख मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु दोन वर्षे होऊनही अद्याप यंत्र उपलब्ध झाले नाही. रुग्णालय प्रशासनाकडून त्याचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र यश आले नाही. महत्त्वाचे म्हणजे, गर्भजल परीक्षण केंद्र चालविण्यासाठी कुशल रेडिओलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञ व पॅथालॉजिस्टची आवश्यक्त असते. जे डागा रुग्णालयाकडे नाही. यामुळे डागाला उपकरण मिळाले तरी या केंद्राला खीळ बसण्याची शक्यता आहे.मेडिकलमध्ये सिकलसेलची चाचणी बंदशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सिकलसेल व थॅलेसिमियाच्या निदानासाठी विकृतीशास्त्र विभागातील ‘एचपीएलसी’ उपकरण कालबाह्य झाले आहे. नवीन उपकरण खरेदी करण्यापेक्षा डागा रुग्णालयाला मिळणारे उपकरण मेडिकलमधील सोयी व विशेषज्ञ लक्षात घेऊन ते वळते करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. परंतु दीड वर्षे होऊनही प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. गेल्या सहा महिन्यापासून मेडिकलमध्ये सिकलसेलची साधी चाचणीही होत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

टॅग्स :Healthआरोग्य