लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या उत्तर नागपुरातील गरम गँग मधील पाच गुंडांच्या जरीपटका पोलिसांनी गुरुवारी पहाटे मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करून त्यांना पोलिसांनी ठाण्यात आणले आणि नंतर चांगलेच थंड केले.हरजितसिंग गरमसिंग गरेवाल (वय २८) रजत चक्रधर खोब्रागडे (वय २५), रवींद्र माणिकराव उईके (वय ३२, तिघेही रा. हुडको कॉलनी), अक्षय राष्ट्रपाल चौरे (वय २२, रा. इंदोरा), निखिल शामलाल आसवानी (वय २१, रा. हुडको कॉलनी), चाटी, ऊर्फ विक्की अरुण इंगळे (वय २२, रा. इंदोरा बाराखोली) आणि गजनी ऊर्फ जितू रुगवानी (रा. पाचपावली) अशी आरोपींची नावे आहेत.जरीपटक्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. एस. देवकर हे गुरुवारी पहाटे आपल्या सहकाऱ्यांसह गस्त करीत होते. त्यांना नारा रोड ते समता नगरकडे जाणाºया मार्गावरील पुलाजवळ काही कुख्यात गुंड घातक शस्त्रांसह दडून बसले आहे, अशी माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी पहाटे २. ३० च्या सुमारास पुलाजवळच्या अंधाºया भागात धाव घेतली. तेथे त्यांनी आरोपी गरेवाल, उईके, खोब्रागडे, चौरे, उईके आणि आसवानी या पाच आरोपींना पकडले. त्यांच्याकडून एक तलवार, चाकू, लोखंडी रॉड, मिरची पावडर आणि दोरी जप्त केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली जरीपटका पोलीस पुढील तपासकरीत आहे.चाटी आणि गजनी पळालापोलीस आल्याची कुणकुण लागताच अंधाराचा फायदा घेत चाटी आणि गजनी पळून गेला. पकडण्यात आलेल्या गुन्हेगारांपैकी अनेकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसे सर्व ‘गरम गँग’चे सदस्य आहेत. गुरुवारी ते दरोडा, लुटमार किंवा दुसरा कोणता मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत होते. पळालेल्या साथीदारांची नावे सांगण्यासाठी त्यांनी बरीच टाळाटाळ केली. त्यामुळे पोलिसांनी ठाण्यात आणल्यानंतर या गुन्हेगारांना चांगलेच थंड केले. त्यानंतर त्यांनी फरार झालेल्या चाटी आणि गजनीचे नाव सांगितले.
उत्तर नागपुरातील गरम गँग गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:29 IST
दरोड्याच्या तयारीत असलेल्या उत्तर नागपुरातील गरम गँग मधील पाच गुंडांच्या जरीपटका पोलिसांनी गुरुवारी पहाटे मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करून त्यांना पोलिसांनी ठाण्यात आणले आणि नंतर चांगलेच थंड केले.
उत्तर नागपुरातील गरम गँग गजाआड
ठळक मुद्देदरोड्याच्या तयारीत असताना पकडले : घातक शस्त्रे जप्त, जरीपटका पोलिसांची कारवाई