शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री  रणजित देशमुख यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:03 IST

विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणामध्ये माजी मंत्री रणजित देशमुख व इतर तिघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट बजावला आहे. अन्य आरोपींमध्ये पल्लवी पारीख, भावीन पारीख व अमित धुपे यांचा समावेश आहे. हे चौघेही परसेप्ट वेब सोल्युशन कंपनीचे संचालक आहेत.

ठळक मुद्देजेएमएफसी न्यायालय : धनादेश अनादर प्रकरण

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणामध्ये माजी मंत्री रणजित देशमुख व इतर तिघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट बजावला आहे. अन्य आरोपींमध्ये पल्लवी पारीख, भावीन पारीख व अमित धुपे यांचा समावेश आहे. हे चौघेही परसेप्ट वेब सोल्युशन कंपनीचे संचालक आहेत.अजामीनपात्र वॉरन्ट बजावण्यात आल्यानंतर देशमुख यांचे वकिलाने या प्रकरणातील कारवाईविरुद्ध सत्र न्यायालयात अर्ज प्रलंबित असल्याची माहिती जेएमएफसी न्यायालयाला दिली. तसेच, अजामीनपात्र वॉरन्टवर स्थगिती देण्याची विनंती केली. ही बाब लक्षात घेता जेएमएफसी न्यायालयाने देशमुख यांच्याविरुद्धच्या वॉरन्टवर १९ सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली. त्यामुळे देशमुख यांना तात्पुरता दिलासा मिळाला. इतर आरोपींविरुद्ध मात्र पुढील कारवाई सुरू झाली आहे. जेएमएफसी न्यायालयाने सुरुवातीला चारही आरोपींना समन्स बजावला होता. समन्स तामील होऊनही ते न्यायालयात हजर झाले नाही. त्यानंतर न्यायालयाने जामीनपात्र वॉरन्ट बजावला. त्यालाही आरोपी जुमानले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरन्ट बजावला आहे.अतुल देवगडे यांनी आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रारीतील माहितीनुसार, परसेप्ट वेब सोल्युशन कंपनीने देवगडे यांच्याकडून ११ लाख रुपयांची संगणक सामग्री खरेदी केली होती. कंपनीने ही रक्कम अदा करण्यासाठी देवगडे यांना पाच धनादेश दिले. ते सर्व धनादेश कंपनीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे वठले नाहीत. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया करूनही काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे देवगडे यांनी न्यायालयात धाव घेतली. देवगडे यांच्या वतीने अ‍ॅड. इब्राहीम बक्ष तर, देशमुख यांच्या वतीने अ‍ॅड. अतुल नबिरा यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Ranjit Deshmukhरणजित देशमुखCourtन्यायालय