शिक्षक मतदारसंघ निवडणूक : शुक्रवारी होणार चित्र स्पष्टअमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंंत २१ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. अर्ज छाननी दरम्यान सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. ६ जून ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे वसंतराव खोटरे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने दि. २0 जून रोजी निवडणूक होत आहे. नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंंत २१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. बुधवारी झालेल्या छाननीअंती सर्व २१ अर्ज वैध ठरविण्यात आले. उमेदवारी मागे घेण्याची ६ जून ही अंतिम तिथी असून शुक्रवारी दुपारनंतर या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत ४४ हजार ६१५ मतदार व ७१ मतदान केंद्र आहेत. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक २२ मतदान केंद्र आहेत. तसेच २४ जून रोजी अमरावती येथे मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी)
२१ उमेदवारांचे नामांकन वैध
By admin | Updated: June 6, 2014 00:53 IST