शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात धावते विना तिकीट बस; भरारी पथक झाले थक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 11:08 IST

तोट्यातील आपली बसला सावरण्यासाठी महापालिके चा संघर्ष सुरू आहे. होत असलेला तोटा कमी कसा करता येईल, यावर पर्याय सापडलेला. यादरम्यान महापालिकेच्या भरारी पथकाच्या तिकीट तपासणीत धक्कादायक प्रकार निदर्शनास आले आहेत.

ठळक मुद्देआपली बसचा तोटा कमी कसा होणार? शांतिनगर मार्गावर कारवाई

राजीव सिंह।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोट्यातील आपली बसला सावरण्यासाठी महापालिके चा संघर्ष सुरू आहे. होत असलेला तोटा कमी कसा करता येईल, यावर पर्याय सापडलेला. यादरम्यान महापालिकेच्या भरारी पथकाच्या तिकीट तपासणीत धक्कादायक प्रकार निदर्शनास आले आहेत. सोमवारी पथकाने बर्डी ते शांतिनगर मार्गावर धावणाऱ्या एका बसची तपासणी केली असता बसमध्ये प्रवासी होते, परंतु एकाही प्रवाशाकडे तिकीट नव्हते. तिकीट चोरीचे असे अनेक प्रकार सुरू असून याला वेळीच आळा घालण्यासाठी पारदर्शी तिकीट पद्धत नसल्यास बस तोट्यातून बाहेर पडणे शक्य होणार नाही.बर्डी ते शांतिनगरच्या बस क्रमांक ४१२ मध्ये ३७ प्रवासी होते. या बसची पथकाने सोमवारी बालभारतीजवळ तपासणी केली असता एकाही प्रवाशाकडे तिकीट नसल्याचे आढळून आले. दररोज असे शेकडो प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. परंतु महापालिकेची सक्षम यंत्रणा नसल्याने मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. बस संचालनाची जबाबदारी असलेल्या आयबीटीएम आॅपरेटर डिम्ट्स या प्रकाराला सर्वस्वी जबाबदार आहे. चालक आॅपरेटरने नियुक्त केले आहेत.या आॅपरेटरच्या अनागोंदीमुळे हा प्रकार सुरू आहे. विना तिकीट प्रवास करण्याचे प्रकार थांबले तर बसचा तोटा कमी होऊ शकतो. डिम्ट्सच्या उदासीन कार्यपद्धतीमुळे महापालिकेच्या परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी गेल्या आठवड्यात आयुक्त वीरेंद्र सिंह यांची भेट घेतली व त्यांच्या संमतीनंतर दोन भरारी पथक गठित केले. यामुळे तिकीट चोरीचा प्रकार उाडकीस आला.

भरारी पथकांच्या माध्यमातून बसची तपासणी सुरूच राहणार आहे. महापालिकेत मनुष्यबळाची कमतरता आहे. पथकासाठी कर्मचारी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. कर्मचारी उपलब्ध न झाल्यास परिवहन समितीच्या सदस्यांना यात सहभागी करून कारवाई सुरू ठेवणार आहे. तोटा कमी करणे हाच हेतू आहे

- बंटी कु कडे, सभापती परिवहन समिती

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक