शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील शासकीय वसतीगृहाला चार वर्षात एकही चादर मिळाली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 12:20 IST

युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाली, मात्र सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थी अन्याय सहन करीत आहेत. अनेक वसतिगृहातील चादरी, गाद्या, ब्लँकेट खराब झाल्या आहेत.

ठळक मुद्देसामाजिक न्याय विभागाचा मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय

मंगेश व्यवहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालविण्यात येते. या वसतिगृहांना प्रति विद्यार्थी ९०० रुपये यासह वसतिगृहात लागणारे साहित्य शासनाकडून पुरविण्यात येते. परंतु गेल्या चार वर्षापासून एकाही वसतिगृहांना साहित्य पुरविण्यात आले नाही. अधिकाऱ्यांच्या धाकामुळे वसतिगृह संचालकसुद्धा त्याची तक्रार करीत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आहे त्याच अवस्थेत निवारा करावा लागतो आहे.छत्रपती शाहू महाराज यांच्या संकल्पनेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह असावे यातून महाराष्ट्र राज्यात समाज कल्याण विभागंतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे अनुदानित वसतिगृह सुरू करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील वर्ग ५ ते १२ पर्यंत दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थी निवास, भोजनसह शालेय शिक्षण घेत आहेत. महाराष्टात २३८८ अनुदानित वसतिगृह असून, त्यात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या वसतिगृहांना सामाजिक न्याय विभागांतर्गत चादर, ब्लँकेट, गादी, ताट, ग्लास, वाचनालयासाठी पुस्तके, सूक्ष्म अन्नद्रव्य, पूरक आहार, नाईट ड्रेस, कॉम्प्युटर, प्रिंटर, युपीएस, बॅटरी, कपाट, सतरंजी, बेडशिट या वस्तू पुरविण्यात येतात. २०१४ पर्यंत दरवर्षी काहीतरी साहित्य मिळत होते. पण त्यानंतर आजपर्यंत एकाही वसतिगृहाला साहित्याचा पुरवठा झाला नाही. युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाली, मात्र सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थी अन्याय सहन करीत आहे. अनेक वसतिगृहातील चादरी, गाद्या, ब्लँकेट खराब झाल्या आहे. वाचनालयासाठी पुस्तके सुद्धा आली नाही. त्यामुळे आहे त्याच अवस्थेत विद्यार्थी निवारा करीत आहे.कर्मचारीही घोषणा पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेतविद्यार्थ्याप्रमाणे कर्मचारीसुद्धा अन्यायग्रस्त आहेत. राज्यभरात ८१०४ अधीक्षक, स्वयंपाकी, चौकीदार, मदतनीस २४ तास वसतिगृहात काम करीत आहेत. ८०००, ६०००, ५००० रुपये एवढे तुटपुंजे मानधन त्यांना मिळते आहे. सरकारने ५० टक्के मानधन वाढीची घोषणा करून चार वर्षे लोटले आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थी