शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा रुग्णालयात नाही अ‍ॅण्टी रॅबिज व्हॅक्सिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:06 IST

महानगरपालिका प्रशासन आरोग्य सेवेसंदर्भात मोठमोठे दावे करते, पण या क्षेत्रात अद्यापही समाधानकारक सुधारणा झाली नाही. याची उदाहरणे नेहमीच पाहायला मिळतात. मंगळवारी एका घटनेमुळे प्रशासनाची पुन्हा पोलखोल झाली.

ठळक मुद्देधक्कादायक : युवक निराश होऊन घरी परतला

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महानगरपालिका प्रशासन आरोग्य सेवेसंदर्भात मोठमोठे दावे करते, पण या क्षेत्रात अद्यापही समाधानकारक सुधारणा झाली नाही. याची उदाहरणे नेहमीच पाहायला मिळतात. मंगळवारी एका घटनेमुळे प्रशासनाची पुन्हा पोलखोल झाली.ही घटना दुपारी १२.१५ वाजताची आहे. लकडगंज येथील ऋषभ आवळे हा युवक दुचाकीने घरी जात होता. दरम्यान, लकडगंज पोलीस ठाण्याजवळ काही कुत्री त्याच्या अंगावर धावून गेली. एका कुत्र्याने त्याच्या पायाचा चावा घेतला. त्यानंतर त्याने उपचारासाठी प्रभाकरराव दटके मनपा रुग्णालयात धाव घेतली, पण त्याची निराशा झाली. डॉक्टरांनी त्याला अ‍ॅण्टी रॅबिज व्हॅक्सिन उपलब्ध नसल्याचे सांगून हे व्हॅक्सिन बाहेरून खरेदी करण्याचा सल्ला दिला. अधिक विचारपूस केल्यानंतर डॉक्टरांनी या रुग्णालयात चार महिन्यापासून व्हॅक्सिन उपलब्ध नसल्याची माहिती दिली. या घटनेमुळे मनपा रुग्णालयातील अव्यवस्थेची पोलखोल झाली. ऋषभला निराश होऊन घरी परतावे लागले.लकडगंजमध्ये कुत्र्यांची दहशतलकडगंज भागात बेवारस कुत्र्यांची दहशत आहे. ती कुत्री येणाऱ्या-जाणाऱ्यांवर धावून जातात. यासंदर्भात महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही काहीच कारवाई करण्यात आली नाही, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाhospitalहॉस्पिटलdogकुत्रा