शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'कापसाला भाव नाही, नुकसानीच्या झळा; सोसणारा शेतकरी आत्महत्या करतोय'

By जितेंद्र ढवळे | Updated: October 23, 2023 16:13 IST

यवतमाळमध्ये ४६० शेतकऱ्यांच्या आत्महत्या : अनिल देशमुख यांची सरकारवर टीका

नागपूर : सरकार पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे. आधी दुष्काळ नंतर अतिवृष्टीने संकटात सापडलेला शेतकरी कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या करतोय. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाला भाव मिळत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आ. अनिल देशमुख यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.

देशमुख म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे कापसाचे भाव पडले. आघाडी सरकार असताना कापसाला १२ हजार रुपये भाव मिळाला. आता कापसाला ७ हजारही भाव मिळत नाही. अशात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नाही. दुसरीकडे विविध रोगांमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. मात्र, बाजारात सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही. शासन मदत जाहीर करते; पण, ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही. यामुळे कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करताहेत. यवतमाळ जिल्ह्यात २०२२ मध्ये २७२ तर सप्टेंबर-२०२३ पर्यंत १८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकार शेतकरी आत्महत्येवर गप्प का, असा सवाल देशमुख यांनी याप्रसंगी केला.

देशात भाव नसताना कापसावर जे ११ टक्के आयात शुल्क होते ते माफ करून जवळपास १६ लाख गाठी विदेशातून आयात का करण्यात आल्या, असा सवालही त्यांनी केला. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रा.वर्षा निकम, प्रदेश उपाध्यक्ष अफझल फारूक, जि.प.सदस्य सलील देशमुख उपस्थित होते.

सरकारची मदत कागदावरचराज्यात पावसाने दांडी मारल्याने व नंतर अतिवृष्टी व विविध रोगांच्या प्रादुर्भावाने कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी १ हजार ७१ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू, असे आश्वासन देण्यात आले. परंतु, अद्यापही ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुख