शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात एकाही खुल्या रेस्टारंटकडे परवानगी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:53 IST

मुंबई येथील रेस्टॉरंटमध्ये आग लागण्याची घटना घडल्यानंतर नागपूर महापालिकेचा अग्निशमन विभाग सक्रिय झाला आहे. शहरातील रेस्टॉरंट, हॉटेल व बार आदींची तपासणी सुरू केली आहे. पाहणी दरम्यान टेरेसवर शेड निर्माण करून खुले रेस्टॉरंट कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेत अग्निशमन विभागाने अशा खुल्या रेस्टॉरंटला नोटीस बजावण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे रेस्टॉरंट चालकांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देअग्निशमन विभागाकडून दखल : नोटीस बजावल्याने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई येथील रेस्टॉरंटमध्ये आग लागण्याची घटना घडल्यानंतर नागपूर महापालिकेचा अग्निशमन विभाग सक्रिय झाला आहे. शहरातील रेस्टॉरंट, हॉटेल व बार आदींची तपासणी सुरू केली आहे. पाहणी दरम्यान टेरेसवर शेड निर्माण करून खुले रेस्टॉरंट कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेत अग्निशमन विभागाने अशा खुल्या रेस्टॉरंटला नोटीस बजावण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे रेस्टॉरंट चालकांचे धाबे दणाणले आहे.नागपूर शहरात ४७२ हॉटेल व रेस्टॉरंट आहेत. अग्निशमन विभागाची परवानगी न घेता यातील नऊ ठिकाणी टेरेसवर खुल्या जागेवर शेड उभारून रेस्टॉरंट सुरू केले आहे. २०१५ मध्ये राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात रेस्टॉरंट वा बार सुरू करताना अग्निशमन विभागाच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर परवानी घेण्याची पद्धत बंद झाली. परंतु मुंबई येथील घटनेनंतर राज्य सरकारने नवीन परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार रेस्टॉरंट, बार व हॉटेल अशा ठिकाणी आग नियंत्रण यंत्रणा उपलब्ध आहे की नाही. याबाबत अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ही व्यवस्था नसलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट चालकांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. ही जबाबदारी कळमना अग्निशमन केंद्राचे बी.पी.चंदनखेडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी अनेक रेस्टॉरंट व हॉटेलची पाहणी केली. यात परवानगी न घेता टेरेसवर सुरु करण्यात आलेले रेस्टॉरंट तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानंतर कारवाईला गती आली आहे.

टॅग्स :hotelहॉटेलnagpurनागपूर