शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

ना ओटीपी - ना लिंक, फक्त व्हॉट्सअँप इमेजने फोनचे हॅकिंग

By योगेश पांडे | Updated: June 2, 2025 12:22 IST

Nagpur : स्मार्टफोन युझर्ससाठी धोक्याची घंटा

योगेश पांडेनागपूर : हॅकर्सकडून आता व्हॉट्सअॅप इमेजचा फोनची हॅकिंग करत पूर्ण नियंत्रण स्वत:कडे घेण्यावर भर देण्यात येत आहे. संबंधित फोन्समध्ये मालवेअर पोहोचविण्यासाठी व्हॉट्सअॅप इमेजेसचा 'ट्रोजन हॉर्स' म्हणून वापर करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकदा कुतूहलापोटी स्मार्टफोन वापरताना सामान्य जनता इमेज उघडते आणि फोन काही सेकंदात हॅक होतो. त्यानंतर बैंक खाते, यूपीआय खाते, ओटीपी या सर्वांचा आरोपी सहजपणे वापर करू शकतात. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका रहिवाशाने अज्ञात व्हॉट्सअॅप क्रमांकावरून पाठवलेली प्रतिमा उघडल्यानंतर जवळजवळ अडीच लाख गमावले. त्यानंतर या घोटाळ्याची गंभीरता समोर आली.

इमेजवर हॅकिंगसाठी कोडचे 'एम्बेडिंग'हॅकर्स आता वापरकर्त्याच्या डिव्हाइसमध्ये थेट मालवेअर पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअॅप इमेजेसचा ट्रोजन हॉर्स म्हणून वापर करत आहेत. ह प्रकार स्टेग्नोग्राफीवर अवलंबून आहे. सायबर गुन्हेगार यात इमेज फाइल्समध्ये फोनला हॅक करू शकणारा कोड 'एम्बेड करतात. संबंधित इमेज युझर्सने उघडली की तो मालमेअर फोनमध्ये इन्स्टॉल होतो. त्यानंतर फोनचा पूर्ण कंट्रोल गुन्हेगारांकडे जातो. फोनधारकाच्या माहितीशिवाय त्यातील संवेदनशील डेटा, बैंकिंग केडेन्शियल्स, पासवर्ड आणि आर्थिक व्यवहार गुन्हेगार जगात कुठेही बसून करू शकतात.

पारंपरिक फिशिंगपेक्षा जास्त धोकादायकसायबर सुरक्षा तज्ज्ञांनी या घोटाळ्याला पारंपरिक फिशिंगच्या फंड्यापेक्षा जास्त धोकादायक असे संबोधले आहे. याचे स्वरूप हे अगदी सामान्य असून, सहजपणे एखाद्या इमेजवर क्लिक केल्यावरदेखील धोक्याचे लगेच संकेत मिळत नाहीत. त्यामुळे अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या व्हॉट्सअॅप इमेजेस डाउनलोड न करणे हाच यावरील एकमेव उपाय आहे.

सिमकार्ड बंद करून मारला जातोय डल्लाकाही सायबर गुन्हेगारांकडून तर परस्पर सिमकार्ड बंद करून संबंधितांच्या बैंक खात्यांवर डल्ला मारण्यात येत आहे. नागपुरातच मे महिन्यात अशी घटना समोर आली आहे. एका कोचिंग क्लास संचालकाचे गुन्हेगारांनी सिमकार्ड परस्पर बंद केले व त्याच क्रमांकाचे नवीन सिमकार्ड विकत घेतले. त्याच्या आधारावर त्याच्या बैंक खात्याचे इंटरनेट बैंकिग सुरू केले व १० लाख रुपये वळते केले. संबंधित शिक्षकाला बँकेतून पैसे काढल्या गेल्याचा थांगपत्तादेखील नव्हता. असे प्रकार देशातदेखील काही ठिकाणी घडले आहेत. त्यामुळे अशा आरोपींना शोधणे हे सायबर सेलसमोरील मोठे आव्हान आहे. अशा प्रकरणात केवळ बँक खात्यांच्या 'मनी ट्रेल'च्या माध्यमातूनच किंवा मोबाइलच्या आयएमईआय क्रमांकातूनच आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य आहे.

स्मार्टफोन युझर्ससाठी धोक्याची घंटामागील काही काळात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वेगाने वाढत असून, गुन्हेगारांकडून विविध फंडे वापरण्यात येत आहेत. अगोदर ओटीपी, लिंकच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार युझर्सला टार्गेट करत होते. मात्र, आता तर चक्क केवळ व्हॉट्सअॅप इमेजने फोनचे हॅकिंग सुरू झाले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ही स्मार्टफोन युझर्ससाठी धोक्याची घंटा मानण्यात येत आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूरfraudधोकेबाजी