शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पदवी प्रवेशासाठी ‘ऑनलाईन’ नोंदणीची अट नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 23:49 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदवीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पदवी प्रवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठ संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविधिसभा सदस्यांचा सूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदवीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पदवी प्रवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठ संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील असून, गरीब विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ सुविधादेखील उपलब्ध नाहीत. अशास्थितीत ‘ऑनलाईन’ नोंदणीची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी विद्यापीठ वर्तुळासह विधिसभा सदस्यांकडूनदेखील करण्यात येत आहे. यासंदर्भात विधिसभेचे सदस्य अ‍ॅड. मनमोहन बाजपेयी यांनी यासंदर्भात प्रभारी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांना पत्रदेखील पाठविले आहे.सद्यस्थितीत ‘कोरोना’मुळे अनेकांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. पदवीला प्रवेश घेऊ इच्छिणारे अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. अशास्थितीत त्यांना ‘इंटरनेट कॅफे’ची सुविधा उपलब्ध असेलच की नाही, हे सांगता येत नाही. भौगोलिक स्थिती लक्षात घेता अनेकांसाठी तर ‘ऑनलाईन’ अर्ज भरायला जाणे ही देखील एक परीक्षाच ठरणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू शकतात. या अटीचा त्यांना कुठलाही फायदा होणार नाही.महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ अर्ज भरण्यासाठी सहकार्य करावे, असे विद्यापीठाने सांगितले आहे. परंतु अनेक महाविद्यालयातदेखील ‘नेट कनेक्टिव्हिटी’ अतिशय संथ आहे. मग ते विद्यार्थ्यांना कसे मदत करू शकणार, असा प्रश्न अ‍ॅड. मनमोहन बाजपेयी यांनी उपस्थित केला आहे. काही विधिसभा सदस्यांनीदेखील विद्यापीठाच्या ‘आॅनलाईन’ भूमिकेला विरोध करत ‘ऑफलाईन’ नोंदणीचीदेखील संधी देण्याची मागणी केली आहे.बाहेरील विद्यार्थ्यांचे काय?बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांना नागपूर किंवा इतर जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल. मात्र दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी वाहतुकीचे साधन उपलब्ध नाही. अशास्थितीत विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन कागदपत्रे देऊन प्रवेश कसा घ्यायचा, हा मोठा प्रश्न आहे. शिवाय महाविद्यालयात गर्दी झाल्यानंतर ‘कोरोना’चा प्रकोप होण्याचा धोका आहे. अशास्थितीत कुलगुरू याची जबाबदारी घेणार का, असा प्रश्न पत्रकारिता अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठonlineऑनलाइन