शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

नागपुरात  सरकारी कार्यालयात बुधवारीही शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 20:30 IST

शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळीच्या सुट्यांची झिंंग अजूनही उतरलेली नाही. शनिवारपासून बंद असलेली शासकीय कार्यालये बुधवारी उघडली. मात्र कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी आढळून आली.

ठळक मुद्देकर्मचारी अजूनही सुट्यांच्या मानसिकतेत : कामांवर झाला परिणाम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळीच्या सुट्यांची झिंंग अजूनही उतरलेली नाही. शनिवारपासून बंद असलेली शासकीय कार्यालये बुधवारी उघडली. मात्र कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी आढळून आली. कर्मचाऱ्यांबरोबरच अधिकाऱ्यांनीही कामकाजाच्या पहिल्या दिवशी बुट्टी मारली होती.सिव्हील लाईन्सच्या प्रशासकीय परिसरात बुधवार रोजी रविवारसारखे वातावरण अनुभवायला मिळाले. परिसरात असलेले विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा परिषद यासह प्रशासकीय इमारत क्रमांक १ व २ मध्ये शासनाच्या विविध विभागाचे कार्यालय आहे. त्यामुळे या प्रशासकीय परिसरात कार्यालयीन वेळेत कामकाजासाठी येणाऱ्या-जाणाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची सातत्याने वर्दळ असते. बुधवारी मात्र परिसरात बऱ्यापैकी शुकशुकाट जाणवला. दिवाळीचे लक्ष्मीपूजन रविवारी होते. शासकीय कर्मचाऱ्यांची ही सुटी गेली. मात्र महिन्याचा चौथा शनिवार असल्याने, शनिवारपासूनच शासकीय कार्यालय बंद होती. बुधवारी कामकाजाचा पहिला दिवस होता. पण मोठ्या संख्येने कर्मचारी बुधवारी सुटीवर होते. परिसरातील जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त कार्यालय, प्रशासकीय इमारतींमधील कार्यालयाचा आढावा घेतला असता, ६० ते ७० टक्के कर्मचारी सुटीवर आढळून आले. कर्मचाऱ्यांबरोबरच काही विभागाचे प्रमुखही बुधवारी सुटीवर होते.जे कर्मचारी बुधवारी कार्यालयात आले त्यांची कार्यालयातील वातावरण बघून कामकाज करण्याची मनस्थिती झाली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचीही कार्यालयात सारखी उठबस सुरू होती. परंतु शासकीय कार्यालयात असलेल्या शुकशुकाटीचा फटका कामकाजासाठी येणाऱ्या अभ्यागतांना बसला. बुधवारी कार्यालयांमध्ये सुटीचे वातावरण असल्याने त्यांना परतीचा मार्ग धरावा लागला. विशेष म्हणजे बहुतांश कार्यालयातील शिपाई मात्र कामावर दिसून आले.

टॅग्स :GovernmentसरकारDiwaliदिवाळी