शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाची तिजोरी रिकामी; डांबर मिळेना, खड्डे बुजेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 12:39 IST

नागपूर मनपाची तिजोरी रिकामी असल्याने डांबर व गिट्टीच्या खरेदीबरोबरच मजुरांची व्यवस्था यासंदर्भातील फाईल मंजुरीसाठी अडकली आहे.

ठळक मुद्देपावसाळा संपूनही हॉटमिक्स विभागाकडून क्षमतावाढ नाही

राजीव सिंह।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: पावसाळा थांबल्यानंतर आॅक्टोबरच्या सुरुवातीपासून शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात येते. परंतु मनपाची तिजोरी रिकामी असल्याने डांबर व गिट्टीच्या खरेदीबरोबरच मजुरांची व्यवस्था यासंदर्भातील फाईल मंजुरीसाठी अडकली आहे. महिनाभराचा उशीर झाल्यानंतर आॅक्टोबरच्या सुरुवातीला हॉटमिक्सशी संबंधित फाईलला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतरही रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला अपेक्षित सुरुवात झालेली नाही.हॉटमिक्ससाठी डांबर खरेदी करण्याकरिता अ‍ॅडव्हान्स रक्कम द्यावी लागते. परंतु रोखीची कमी असल्यामुळे डांबर खरेदीसाठी रोख रक्कम उपलब्ध होऊ शकली नाही. जे डांबर वाचले होते त्यातून कसेतरी काम सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विभागाकडे केवळ ७ ते ८ दिवस पुरेल इतकेच डांबर शिल्लक आहे. हे लक्षात घेता घाईघाईत फाईल स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे.जेव्हा की प्रशासकीय प्रक्रिया कधीचीच पूर्ण करण्यात आली होती. रस्त्यावरील खड्ड्यासंदर्भात जनतेतून ओरड होत असल्यामुळे ७.५० लाख रुपयांचा चेक विभागाकडून जारी करण्यात आला आहे. मात्र स्थायी समितीत डांबर खरेदीसाठी ४० लाख १६ हजार ५६० रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, गिट्टीचा दीड महिन्याचा स्टॉक आहे. मजुरी व वाहतुकीची समस्या नाही, परंतु डांबरामुळे कुठलेच काम करता येऊ शकत नाही. हॉटमिक्स एमआयडीसी हिंगणाच्या प्लॅण्टसाठी संबंधित डांबर एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीएल रिफायनरी मुंबई येथून खरेदी करण्यात येते. हॉटमिक्स प्लॅण्ट विभागाकडून १२ मीटर चौरस खड्डे बुजविण्यात येतात. विशेष म्हणजे स्थायी समितीमध्ये गिट्टीसाठी २.३१ कोटी व मजुरीसाठी ४३.३६ लाख रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे.

कोल्ड मिक्सद्वारे बुजविले खड्डेजून ते सप्टेंबर दरम्यानच्या काळात केवळ गणेशोत्सवात काही रस्त्यावर डांबरीकरणाचे काम करण्यात आले. कोल्ड मिक्सद्वारे खड्डे बुजविण्यात आले. गिट्टी व मुरुमाद्वारे तातपुरत्या स्वरुपात खड्डे बुजविण्यात आले. ताजाबादमध्ये ऊर्स असल्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम शुक्रवारी करण्यात आले. यापूर्वी फुटाळा, गांधीसागर, सक्करदरा तलावाच्या रस्त्यावर पॅचवर्क करण्यात आले. एकूणच हॉटमिक्स विभाग वेळ काढण्याचा प्रयत्न करतो आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका