लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनलेले अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कुठलाही आमदार राजीनामा देणार नाही. प्रत्येक आमदाराला मंत्रिपद मिळावे अशी इच्छा असते. परंतु मंत्रिमंडळात किती लोकांचा समावेश करावा याची संख्या मर्यादित असते. त्यामुळे सगळ्यांची इच्छा पूर्ण होत नाही. मंत्रिपद न मिळाल्यामुळे काही आमदारांची नाराजी स्वाभाविक आहे. पण याचा अर्थ ते राजीनामा देईल, हे शक्य नाही. कॅबिनेट मंत्र्याची शपथ घेतल्यानंतर अनिल देशमुख यांचे नागपुरात आगमन झाले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.देशमुख गृहमंत्री बनणार अशी चर्चा आहे. याबद्दल स्पष्ट करताना ते म्हणाले की, पक्ष मला जे जबाबदारी देईल, या निष्ठेने पार पाडेल. त्यांना मंत्री म्हणून पुन्हा संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले. दरम्यान मंगळवारी सकाळी १०.१५ वाजता अनिल देशमुख हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जयघोष केला. ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी ताल धरला. यावेळी माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रदेश सचिव दिलीप पनकुले, गंगाप्रसाद ग्वालवंशी, बजरंग परिहार, शहराध्यक्ष अनिल अहिरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, राजू राऊत, राजाभाऊ टांकसाळे, देविदास घोडे, मधुकर भावसार, ईश्वर बाळबुधे, नुतन रेवतकर, अशोक काटले, ज्वाला धोटे, विशाल खांडेकर, योगेश कोठेकर, दुनेश्वर पेठे, शैलेंद्र तिवारी, विक्र ांत देशमुख, अमित गायधने आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी सर्वांचे स्वागत स्विकारले. त्यानंतर साई मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी आरती देशमुख उपस्थित होत्या.
कुठलाही आमदार राजीनामा देणार नाही : अनिल देशमुख यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 22:29 IST
महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनलेले अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कुठलाही आमदार राजीनामा देणार नाही.
कुठलाही आमदार राजीनामा देणार नाही : अनिल देशमुख यांचा दावा
ठळक मुद्देविमानतळावर जंगी स्वागत