शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तूर्त ‘लॉकडाऊन’ नाही! मनपा प्रशासनाचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 21:39 IST

मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई यासह अन्य शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले. त्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागपुरात कोरोनाबधिताची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी निर्बंध न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र शुक्रवारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत आयुक्तांनी लॉकडाऊन हाच पर्याय नसल्याचे स्पष्ट करीत तूर्त लॉकडाऊन लागणार नाही, असे संकेत दिले.

ठळक मुद्देशहरात अफवांचे पेव, संभ्रमामुळे अधिकाऱ्यांना विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई यासह अन्य शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले. त्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागपुरात कोरोनाबधिताची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी निर्बंध न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र शुक्रवारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत आयुक्तांनी लॉकडाऊन हाच पर्याय नसल्याचे स्पष्ट करीत तूर्त लॉकडाऊन लागणार नाही, असे संकेत दिले.नागपूर शहरात मागील काही दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासोबतच दररोज प्रतिबंधित क्षेत्रातही भर पडत आहे. नागरिकांनी जबाबदारीने वागावे, नियम व शर्तीचे पालन करावे. लॉकडाऊन लावणे तुमच्या हातात आहे, असे आवाहन आयुक्तांनी केले होते. महापौर संदीप जोशी यांनीही शहराच्या विविध भागात दौरा करून नागरिकांना निर्बंध लावण्यास भाग पाडू नका, असा इशारा देत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. परंतु बाजारात, सार्वजनिक ठिकाणी ‘फिजिकल डिस्टन्स’ व निर्बंधाचे पालन होत नसल्याचे चित्र असल्याने नागपुरात पुन्हा लॉकडाऊन लागेल, अशी चर्चा सुरू झाली . यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यामुळे अनेकांनी भ्रमणध्वनीवरून मनपा अधिकाºयांना लॉकडाऊन संदर्भात विचारणा केली. परंतु लॉकडाऊन लावायचे झाले तरी प्रशासनाला या संदर्भात आवश्यक ती तयारी करावी लागेल. पोलीस व अन्य विभागाची यंत्रणा सज्ज ठेवावी लागेल.नियम पाळणे गरजेचे‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अनेक बाबतीत शिथिलता देण्यात आली. दुकानांचे दिवस ठरवण्यात आले. दिशानिहाय ऑड-इव्हन फॉर्म्युला ठरवून देण्यात आला. तरीही या नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळेच आयुक्तांनी शहरातील नागरिकांना लॉकडाऊनचा इशारा दिला होता.संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ते सर्वांच्या हिताचे आहे. लॉकडाऊन अंतिम पर्याय नाही. तूर्त लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही.राम जोशी, अपर आयुक्त, मनपाशहरात अफवांचे पेवराज्यातील मोठ्या शहरात पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यात नागपूर शहरात गेल्या काही दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात पुन्हा लॉकडाऊन लावले जाईल, अशा स्वरूपाच्या चर्चेचे पेव फुटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर