शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘इमर्जन्सी आऊटएज’च्या नावावर उपराजधानीत ‘बत्ती गुल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:46 IST

‘मेन्टेनन्स’च्या नावाखाली प्रत्येक आठवड्यात बुधवारी तासन्तास वीजपुरवठा बंद केल्यामुळे झालेल्या वादानंतर आता महावितरणने नवीन युक्ती शोधली आहे. आपात्कालीन स्थिती म्हणजेच ‘इमर्जन्सी आऊटएज’च्या नावाखाली वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसाप्ताहिक ‘मेन्टेनन्स’ला लपविण्याचा प्रयत्न नागरिकांना कुठलीही सूचना नाही

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘मेन्टेनन्स’च्या नावाखाली प्रत्येक आठवड्यात बुधवारी तासन्तास वीजपुरवठा बंद केल्यामुळे झालेल्या वादानंतर आता महावितरणने नवीन युक्ती शोधली आहे. आपात्कालीन स्थिती म्हणजेच ‘इमर्जन्सी आऊटएज’च्या नावाखाली वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ‘इमर्जन्सी आऊटएज’ केवळ बुधवारीच होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान जनता यामुळे हैराण आहे. अगोदरप्रमाणे याची कुठलीही आगाऊ माहिती देण्यात येत नसल्याचे चित्र आहे.बुधवारचा दिवस हा साप्ताहिक ‘मेन्टेनन्स’साठी आरक्षित असतो. महावितरणतर्फे नागरिकांना अगोदरच माहिती देण्यात येते. मात्र याअंतर्गत एकाच भागातील वीजपुरवठा वारंवार कापण्यात येत नाही. महावितरणने उन्हाळ्यामध्ये नियमांचे पालन केले नाही. ‘मेन्टेनन्स’ची निविदाप्रक्रिया न झाल्यामुळे ३० जूनपर्यंत मान्सूनपूर्व मोहीम पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात अनेकदा वीजपुरवठा खंडित झाला. या मुद्द्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. ऊर्जामंत्री चंद्रशेकर बावनकुळे यांनीदेखील अधिकाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला. अशा स्थितीत महावितरणने नवीन मार्ग शोधून काढला आहे. ग्राहकांना कुठलीही पूर्वकल्पना न देता बुधवारी सकाळी वीजपुरवठा बंद करण्यात येतो. वीज गेल्यानंतर ग्राहकांना ‘इमर्जन्सी आऊटएज’बद्दल ‘एसएमएस’ करण्यात येत आहेत. यात वीजपुरवठा कधी सुरळीत होईल याची वेळ सांगण्यात येते. जर वीजपुरवठा आपात्कालीन कारणांमुळे बंद करण्यात येतो, तर समस्या ठीक कधी होईल हे अगोदरपासूनच कसे कळते, असा प्रश्न ग्राहकांकडूनउपस्थित होत आहे.

पावसामुळेदेखील अडचणदरम्यान, दिवसभर येत असलेल्या पावसामुळेदेखील काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित राहिला. यातील बहुतांश प्रकरणे व्यक्तिगत तक्रारींची होती. वर्धा मार्ग स्थित एका अपार्टमेन्टचा एक ‘फेज’ गेला होता. तक्रार केल्यानंतर काही तासांनी महावितरणचे कर्मचारी पोहोचले.

अनेक भागांमध्ये संकटमहावितरणच्या अंतर्गत येणाºया अनेक भागात बुधवारी वीजसंकट राहिले. वर्धा मार्ग, स्नेहनगर यासारख्या भागात सकाळी सकाळी वीजपुरवठा खंडित झाला. नागरिकांना नंतर ‘इमर्जन्सी आऊटएज’चा ‘एसएमएस’ आला. ‘मॅसेज’मध्ये नमूद वेळेच्या तासानंतर वीज आली. ‘मेन्टेनन्स’चे काम पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक अडथळ्यामुळे वीजपुरवठा आणखी वेळ खंडित राहिला, असे महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :electricityवीज