ग्राहकांना मनस्ताप : चार तास मोबाईल नेटवर्क ठप्प नागपूर : सोमवारी दुुपारच्या सुमारास मोबाईल नेटवर्क ठप्प पडल्याने आयडिया कंपनीच्या ग्राहकांना तीन ते चार तास मोबाईलवरून संपर्क साधता आला नाही. कॉल केल्यानंतर दुसऱ्या फोनवर रिंग जात नव्हती. मोबाईलवरून दुसऱ्या व्यक्तीसोबत कोणत्याही स्वरूपाचा संपर्क साधता येत नव्हता. त्यामुळे या कंपनीच्या ग्राहकांना काही तास त्रास सहन करावा लागला. यासंदर्भात चौकशी केली असता, तांत्रिक कारणामुळे नेटवर्क ठप्प पडल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली. तसेच सायंकाळी ६ पर्यंत नेटवर्क सुरळीत झाल्याचा दावा करण्यात आला. सणासुदीच्या दिवसात एकमेकांना शुभेच्छा देण्यासोबतच व्यापारी क्षेत्रात क्षणाक्षणाला मोबाईलचा वापर केला जातो. त्यामुळे नेटवर्क ठप्प असलेल्या कालावधीत आयडियाचे ग्राहक कंपनीक डे वारंवार तक्रारी करीत होते. काहींनी कंपनीच्या नजीकच्या केंद्राकडे तक्रारी केल्या. मात्र नेटवर्क नेमके कशामुळे ठप्प पडले होते, यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले नाही. (प्रतिनिधी)
नो आयडिया सरजी...
By admin | Updated: October 11, 2016 03:33 IST