शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत ई-मेल आयडीची सक्ती नको

By admin | Updated: September 23, 2016 03:05 IST

बँकांनी ग्राहकांना ई-मेल आयडी देण्याची सक्ती करू नये यासाठी एका वृद्ध दाम्पत्याने लिहिलेल्या पत्राची मुंबई उच्च न्यायालयाच्या

वृद्ध दाम्पत्याचे हायकोर्टाला पत्र : याचिका म्हणून दखलनागपूर : बँकांनी ग्राहकांना ई-मेल आयडी देण्याची सक्ती करू नये यासाठी एका वृद्ध दाम्पत्याने लिहिलेल्या पत्राची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका म्हणून दखल घेतली आहे.प्रभाकर व प्रमिला किन्हेकर असे व्यथित दाम्पत्याचे नाव असून ते सीताबर्डी येथील रहिवासी आहेत. पत्रातील माहितीनुसार, त्यांचे युको बँकेत बचत खाते आहे. तसेच, त्यांनी काही रकमेची मुदत ठेव ठेवली आहे. त्यांचे उत्पन्न करपात्र नाही. यामुळे त्यांनी गेल्या एप्रिलमध्ये बँकेला १५एच अर्ज भरून दिला. बँकेच्या अधिकाऱ्याने आवश्यक बाबी तपासून अर्ज ठेवून घेतला. आता त्यांना ई-मेल आयडी मागण्यात आला आहे. ई-मेल आयडी नसल्यास अर्ज अपूर्ण समजून व्याजावर टीडीएस कपात करण्याची सूचना त्यांना देण्यात आली आहे. यामुळे हे दाम्पत्य अडचणीत सापडले आहे. ई-मेल आयडी हे काय उपकरण आहे हे आपल्याला माहीतच नसल्याचे व हे उपकरण खरेदी करण्याची आपली ऐपत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ई-मेल आयडीला उपकरण संबोधून त्यांनी याबातची अनभिज्ञता स्पष्ट केली आहे.याप्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. अनिल किलोर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली. तसेच, त्यांना यासंदर्भात दोन आठवड्यांत नियमानुसार याचिका सादर करण्याचे निर्देश दिलेत.(प्रतिनिधी)