शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधतेशिवाय अभ्यासक्रम प्रवेशाला धक्का नाही; हायकोर्टाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 12:07 IST

जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ देण्याच्या तरतुदीला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तांत्रिक कारणावरून फेटाळून लावली.

ठळक मुद्देआव्हान देणारी याचिका खारीज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ देण्याच्या तरतुदीला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तांत्रिक कारणावरून फेटाळून लावली. त्यामुळे ही तरतूद कोणत्याही धक्क्याशिवाय कायम राहिली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधतेचे दावे प्रलंबित असलेले मागासवर्गीय विद्यार्थी निर्धारित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र देऊन २०१८-१९ मधीलव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील अशी तरतूद गेल्यावर्षी जात प्रमाणपत्र कायद्यातील कलम ४-ए मध्ये करण्यात आली. त्याविरुद्ध हुडकेश्वर येथील पूजा उईके या विद्यार्थिनीने ही याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने एखादी व्यक्ती थेट प्रभावित होत नाही तेव्हापर्यंत या तरतुदीची वैधता तपासली जाऊ शकत नाही असे स्पष्ट करून ही याचिका मंजूर करण्यास नकार दिला. त्यामुळे ही तरतूद कायम राहिली.

याचिकाकर्तीचे म्हणणेमागासवर्गीय विद्यार्थी या तरतुदीचा गैरफायदा घेतील. ते हमीपत्रावर प्रवेश मिळवतील व जात वैधता प्रमाणपत्राचा दावा खारीज झाल्यानंतर शिक्षणाला संरक्षण मिळण्याची मागणी करतील. त्यामुळे खऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. परिणामी, ही तरतूद अवैध ठरवून रद्द करण्यात यावी असे याचिकाकर्तीचे म्हणणे होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय