शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्यावर अविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:56 IST

शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची परिवहन सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने वर्षभरापूर्वी चार आॅपरेटरची नियुक्ती करून त्यांच्यावर परिवहन सेवेची जबाबदारी सोपविली. परंतु यातील ग्रीन बस सेवा मागील काही दिवसापासून बंद आहे. रेड बस आॅपरेटरला वेळेवर बिल मिळत नसल्याने बस सेवा बंद पडण्याचा निर्माण झालेला धोका, कर्मचाऱ्यांचा वारंवार होणारा संप यामुळे शहरातील प्रवासी वेठीस धरले जात आहे. दुसरीकडे समितीला विश्वासात न घेता परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप परस्पर निर्णय घेतात. यामुळे जगताप यांना त्यांची मूळ आस्थापना असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात पाठविण्यात यावे. अशा आशयाची मागणी परिवहन समितीच्या सदस्यांनी केली आहे.

ठळक मुद्देपरिवहन समितीच्या बैठकीत निर्णय : जगताप यांना मूळ आस्थापनेवर पाठविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची परिवहन सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने वर्षभरापूर्वी चार आॅपरेटरची नियुक्ती करून त्यांच्यावर परिवहन सेवेची जबाबदारी सोपविली. परंतु यातील ग्रीन बस सेवा मागील काही दिवसापासून बंद आहे. रेड बस आॅपरेटरला वेळेवर बिल मिळत नसल्याने बस सेवा बंद पडण्याचा निर्माण झालेला धोका, कर्मचाऱ्यांचा वारंवार होणारा संप यामुळे शहरातील प्रवासी वेठीस धरले जात आहे. दुसरीकडे समितीला विश्वासात न घेता परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप परस्पर निर्णय घेतात. यामुळे जगताप यांना त्यांची मूळ आस्थापना असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात पाठविण्यात यावे. अशा आशयाची मागणी परिवहन समितीच्या सदस्यांनी केली आहे.परिवहन समितीच्या बैठकीत गुरुवारी उपसभापती प्रवीण भिसीकर, अर्चना पाठक, मनिषा धावडे, वैशाली रोहणकर, नरेंद्र वालदे, उज्ज्वला शर्मा व नितीन साठवणे आदींनी परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांना शिवाजी जगताप यांच्या कार्यशैलीवर असमाधानी असल्याबाबतचे पत्र दिले. समितीच्या बैठकीत वारंवार सूचना केल्यानंतरही जगताप यांनी आजवर समितीकडे अहवाल सादर केलेला नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न होणे अपेक्षित आहे. परंतु या दृष्टीने जगताप यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाही, असा आरोप या पत्रातून केला आहे.महापािलकेत स्थायी समिती व परिवहन समितीला वैधानिक अधिकार आहेत. स्थायी समिती प्रमाणे परिवहन समितीचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जातो. समितीला स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. असे असूनही जगताप यांनी असहकाराची भूमिका स्वीकारल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. हा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे पाठविला जाणार की नाही. याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.महापालिकेच्या परिवहन विभागात नियमानुसार कामे होत आहेत. ज्या कामांची तातडीने गरज आहे. अशी कामे प्राधान्याने केली जातात. यापूर्वी सुद्धा काही सदस्यांनी तक्रार केली होती. परिवहन समितीचे निर्णय डावलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.शिवाजी जगताप, व्यवस्थापक परिवहन विभाग

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर