शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अनेक रुग्णालयांचा २४ तास पोस्टमार्टेमला ‘ना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 23:16 IST

२४ तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्याचा निर्णय सहा वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला. परंतु अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिक कारणे देत आजही राज्यातील काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सायंकाळचे ७ वाजताच शवविच्छेदन होत नाही.

ठळक मुद्देरात्री ७ वाजताच शवविच्छेदनाची दारे होतात बंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीतच मृताच्या पार्थिवाचे ‘पोस्टमार्टेम’ (शवविच्छेदन) करण्याचा ब्रिटिशकालीन कायदा बदलून २४ तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्याचा निर्णय सहा वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला. परंतु अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिक कारणे देत आजही राज्यातील काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सायंकाळचे ७ वाजताच शवविच्छेदन होत नाही. याला एखादे प्रकरण अपवाद राहू शकते. परंतु रात्री येणारे मृतदेह हे शीतपेटीत ठेवले जात असून दुसऱ्या दिवशीच शवविच्छेदन केले जात आहे.पूर्वी पुरेशा सोईसुविधा उपलब्ध नव्हत्या. अपुऱ्या उजेडात शवविच्छेदनाच्या नियमांचे काटेकोर पालन होणे अशक्य होते. या जुन्या कायद्यामुळे आधीच दु:खात बुडालेल्या मृतांच्या नातेवाईक व आप्तस्वकीयांना या कायद्यामुळे त्रास व्हायचा. तो कमी व्हावा या उद्देशाने तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळात खुनाचे, हुंडाबळी व इतर काही महत्त्वाची प्रकरणे वगळता इतर प्रकरणांमध्ये चौविसही तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातील सूचना सर्वच शासकीय रुग्णालयांना देण्यात आल्या. सुरुवातीला काही रुग्णालयांनी पुढाकारही घेतला. परंतु मंत्री बदलताच मनुष्यबळ, आवश्यक सोई व तांत्रिकदृष्ट्या रात्री शवविच्छेदन करणे शक्य नसल्याची कारणे देत काही रुग्णालयांनी सायंकाळी ७ वाजतानंतर शवविच्छेदन करणेच बंद केले. विशेषत: विदर्भातील शासकीय रुग्णालयांमध्ये हा प्रकार होत आहे.यासंदर्भात काही न्यायवैद्यकशास्त्र तज्ज्ञाने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, तांत्रिकदृष्ट्या दिवसाच्या लख्ख प्रकाशातच शवविच्छेदन करण्याचा नियम आहे. कारण, शवविच्छेदन करताना अनेक छोट्या-छोट्याबाबींचे निरीक्षण केले जाते. यासाठी भरपूर प्रकाशाची आवश्यकता असते. रात्रीच्यावेळी कितीही मोठा व्हॅटचा दिवा लावल्यास अनेक अडचणी येण्याची शक्यता असते. फारच गरज असल्यास विशेषत: कायदा व सुव्यवस्थेच्यावेळी व पोलिसांच्या मागणीला घेऊन रात्री शवविच्छेदन केले जाते. शिवाय, दिवसाच्या तुलनेत रात्रीच्यावेळी फार कमी मृतदेह शवविच्छेदनासाठी येतात. जे रात्री येतात तेच सकाळीच ‘पोस्टमॉर्टेम’ करून देण्याचा आग्रह करतात. महत्त्वाचे म्हणजे, चौविस तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्यासाठी एका पाळीमध्ये एक डॉक्टर दोन अटेंडन्स आणि एक तंत्रज्ञ अशा चार लोकांची टीम हवी असते. परंतु काही रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या फार कमी आहे. ही समस्या निवासी डॉक्टरांना हाताशी धरून सोडविता येत असली तरी अटेंडन्स आणि तंत्रज्ञामुळे अडचण येत असल्याचे या डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय