शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

राजभवनच्या अतिक्रमणावर मनपाचा हातोडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:09 IST

उशिरा का होईना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने राजभवनच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरलेल्या अतिक्रमणाचा सफाया करण्यास सुरुवात केली. बुधवारी विभागाच्या पथकाने राजभवनला लागून असलेले प्रसाधनगृह पाडले तसेच सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या अस्थायी झोपड्याही काढण्यात आल्या.

ठळक मुद्देप्रभाव लोकमतचा : प्रसाधनगृह व अस्थायी झोपड्या काढल्या

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उशिरा का होईना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने राजभवनच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरलेल्या अतिक्रमणाचा सफाया करण्यास सुरुवात केली. बुधवारी विभागाच्या पथकाने राजभवनला लागून असलेले प्रसाधनगृह पाडले तसेच सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या अस्थायी झोपड्याही काढण्यात आल्या.विशेष म्हणजे लोकमतने राजभवनच्या सुरक्षेस बाधा पोहचविणाऱ्या अतिक्रमणाबाबत विस्तारीत वृत्त प्रकाशित केले होते. देशाचे   राष्ट्रपती, उप राष्ट्रपती, पंतप्रधान व इतर अतिविशेष व्यक्तींचे निवासस्थान असलेल्या राजभवनची सुरक्षा या अतिक्रमणामुळे धोक्यात आली होती. मनपाच्या सभागृहात तर ३० जून २००९ मध्येच यातील प्रसाधनगृह पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कारवाईसाठी मनपाला तब्बल नऊ वर्षे लागली. लोकमतच्या वृत्तामुळे जाग आलेल्या महापालिकेने अखेर बुधवारी जेसीबीने प्रसाधनगृहाचे अतिक्रमण पाडले. यासाठी सुरक्षा भिंतीला लागून निर्माण केलेल्या १२ अस्थायी झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. कारवाईदरम्यान परिसरात तणावाची परिस्थितीही असल्याने पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले. प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील व प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या नेतृत्वात नितीन मंथनवार, जमशेद अली, संजय शिंगणे आदींचा कारवाई पथकात समावेश होता.ही तर २० टक्केच कारवाईअतिविशेष व्यक्तींच्या निवासस्थानाची सुरक्षा लक्षात घेता, विविध विभागांच्या कमिटीने सर्वेक्षणाच्या आधारे दिलेल्या सुरक्षा आॅडिटमध्ये धोकादायक ठरणाºया अनेक गोष्टी अधोरेखित केल्या होत्या. यात राजभवनच्या गेटजवळ सदर भागातील हनुमान मंदिराच्या पुजाºयाने केलेले अतिक्रमण, मुस्लीम लायब्ररीच्या मागील बांधकाम, मनपाचे बंद पडलेले नगरभूमापन कार्यालय तसेच सुरक्षा भिंतीला लागून असलेली पक्की घरे आदींचा उल्लेख धोकादायक अतिक्रमण म्हणून अहवालात केला होता. मनपाचे पथक मात्र प्रसाधनगृह आणि झोपड्या पाडून दोन तासात परत फिरले. ही केवळ २० टक्के कारवाई आहे. त्यामुळे ही सुरुवात म्हणावी की केवळ दाखविण्यासाठी ही कारवाई केली गेली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणnagpurनागपूर