शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचाऱ्याला मारहाण : प्रभागातील कामावर कर्मचारी टाकणार बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 23:31 IST

हनुमाननगर झोनच्या सभापती रूपाली परशू ठाकूर यांचे दीर विक्की ठाकूर याने त्याच्या साथीदारांसह महापालिकेचे वाहन चालक नीलेश कमल हातीबेड याला सोमवारी रात्री जबर मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी महापालिका मुख्यालयापुढे कारखाना विभाग व हनुमाननगर झोनच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. मारहाण प्रकरणातील दोषी विक्की ठाकूर याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.

ठळक मुद्देमहापौर, पोलीस आयुक्तांकडे कठोर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हनुमाननगर झोनच्या सभापती रूपाली परशू ठाकूर यांचे दीर विक्की ठाकूर याने त्याच्या साथीदारांसह महापालिकेचे वाहन चालक नीलेश कमल हातीबेड याला सोमवारी रात्री जबर मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी महापालिका मुख्यालयापुढे कारखाना विभाग व हनुमाननगर झोनच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. मारहाण प्रकरणातील दोषी विक्की ठाकूर याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने महापौर नंदा जिचकार, पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय यांच्यासह महापालिक अधिकारी व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. जोपर्यत आरोपीला पकडून कारवाई होत नाही तोपर्यंत प्रभाग क्रमांक ३२ मध्ये महापालिकेच्या कोणत्याही विभागाचे कर्मचारी सेवा देणार नाही. तसेच हनुमाननगर झोनमधील सफाई कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. विक्की ठाकूर याच्यावर कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.सफाई कर्मचारी नीलेश हातीबेड कारखाना विभागात चालक आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास विसर्जनाची माती काढताना शारदा चौक येथे विक्की ठाकूर व त्याच्या साथीदारांनी नीलेशला जबर मारहाण केली. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, नीलेशला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कारखाना विभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. कारखाना विभागातील १२३ कर्मचारी यात सहभागी झाले. काही आवश्यक सेवेतील कर्मचारी मात्र कामावर होते.मंगळवारी दुपारी महापालिका मुख्यालयात कर्मचारी एकत्र झाले. त्यांना मुख्यालयातील कर्मचाऱ्यांचा पाठिंबा मिळाला. अर्धा दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी महापौर नंदा जिचकार यांना निवेदन देऊ न दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली. महापौरांनी पोलीस आयुक्तांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली तसेच दोषीवर कठोर कारवाई करण्यास सांगितले. झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे यांना या प्रकरणात पोलिसात तक्रार करण्यास सांगितले.महापालिका मुख्यालयातील आंदोलनात किशोर समुंद्रे, अविनाश डेलीकर, सुनील जाधव, विक्की बढेल, दीपक कस्तुरे, चेतन समुंद्रे, नवीन समुंद्रे, राजेश हातीबेड, गोविंददास खरे, नितीन वामन, संजू खरे, विशाल मोगरे, राजा समुंद्रे, नितीन बिरहा आदींचा समावेश होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका