शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला सांड पकडणाऱ्या पथकाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 21:05 IST

सांडांना सहजासहजी पकडता येत नाही. सांड बिथरल्यास नुकसान होण्याचाही धोका असतो. याचा विचार करता तामिळनाडू येथील पथकाला शहरातील सांड पकडण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.

ठळक मुद्देएक-दोन दिवसात तामिळनाडूचे पथक येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मोकाट जनावरात सांडांचाही समावेश आहे. कोंडवाडा विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोकाट गाई, म्हशींना पकडणे शक्य होते. परंतु सांडांना सहजासहजी पकडता येत नाही. सांड बिथरल्यास नुकसान होण्याचाही धोका असतो. याचा विचार करता तामिळनाडू येथील पथकाला शहरातील सांड पकडण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. सोमवारी हे पथक येणार होते. परंतु आले नाही. एक-दोन दिवसात पथक नागपुरात येण्याची अपेक्षा आहे.मोकाट गाई व म्हशींना पकडणे सोपे असते. सांड सहजासहजी नियंत्रणात येत नाही. त्यासाठी विशेष प्रशिक्षण आवश्यक असते. तामिळनाडूतील आर. राजकुमार यांचे पथकासोबत सांड पकडण्याचा करार करण्यात आला आहे. प्रतिसांड २ हजार ५०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. १० जणांचे पथक नागपुरात लवकरच दाखल होणार आहे.यापूर्वी २०१३ मध्ये सांड पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, त्यावेळी गोपालकांनी विरोध केल्याने मोहीम राबविणे शक्य झाले नव्हते. याचा विचार करता सांड पकडण्यासाठी शहर पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. यासंदर्भात पोलिसांना पत्र दिले असून कोंडवाडा विभागाने बंदोबस्ताची मागणी केली आहे.नागपूर शहरात सुमारे २५० सांड आहेत. सांड पकडल्यास इतर जनावरांना नियंत्रण घालणे शक्य होईल. सांड पकडताना तो बिथरण्याची शक्यता गृहित धरून या भागातील वाहतूक काही वेळ बंद ठेवावी लागणार आहे. तसेच गोपालकांचा या कारवाईला विरोध होण्याची शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्ताची गरज भासणार आहे. मानकापूर परिसरातून सांड पकडण्याला सुरुवात के ली जाणार आहे.पकडलेले सांड शहरापासून दूरवर असलेल्या गोरक्षण केंद्रात ठेवण्यात येणार आहे. सांड पकडणारे पथक सोमवारी येणार होते. परंतु ते आले नाही. पुढील एक-दोन दिवसात पथक नागपुरात येण्याची अपेक्षा असल्याची माहिती पशुचिकि त्सक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.निवडणुकीमुळे पोलीस बंदोबस्ताची अडचणविधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागणार आहे. अशा परिस्थितीत सांड पकडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळताना अडचण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशावेळी वाहतूक पोलिसांची मागणी केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTamilnaduतामिळनाडू