शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मनपा म्हणते रोडवरचे केवळ एकच अनधिकृत धार्मिकस्थळ वाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:53 IST

महानगरपालिकेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून सार्वजनिक रोडवरचे केवळ एकच अनधिकृत धार्मिकस्थळ वाचले असल्याची माहिती दिली.

ठळक मुद्देहायकोर्टात माहिती : नासुप्रने सांगितले सहा धार्मिकस्थळे बाकी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून सार्वजनिक रोडवरचे केवळ एकच अनधिकृत धार्मिकस्थळ वाचले असल्याची माहिती दिली.नवी शुक्रवारीतील काका हार्डवेअरजवळ शिव मंदिर आहे. ते मंदिर सार्वजनिक रोडवर आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या कारणामुळे ते मंदिर तोडण्यात आले नाही असे मनपाचे म्हणणे आहे. २९ आॅगस्ट २०१८ रोजी सादर प्रतिज्ञापत्रामध्ये मनपाने रोड व फूटपाथवरची १२ अनधिकृत धार्मिकस्थळे वाचली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यापैकी ११ अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्यात आली.नागपूर सुधार प्रन्यासच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या क्षेत्रामध्ये एकूण ५४६ अनधिकृत धार्मिकस्थळे होती. रोड व फूटपाथवर असलेल्या ८७ पैकी ८१ अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्यात आली आहेत. उर्वरित ६ पैकी ४ धार्मिकस्थळे १९६० पूर्वी बांधण्यात आली असून त्यावर निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरीय समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दोन धार्मिकस्थळे खासगी जमिनीवर आहेत.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सार्वजनिक रोड व फूटपाथवर बांधण्यात आलेल्या कोणत्याही अनधिकृत धार्मिकस्थळाला संरक्षण नाही. तसेच, २९ सप्टेंबर २००९ नंतरची सार्वजनिक भूखंडांवरील अनधिकृत धार्मिकस्थळेही पाडणे आवश्यक आहे. यासंदर्भात मनोहर खोरगडे व डॉ. गजानन झाडे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर येत्या शुक्रवारी पुढील सुनावणी होईल. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयReligious Placesधार्मिक स्थळे