शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

मनपा प्रभाग क्रमांक १२ (ड) पोटनिवडणूक : ग्वालबंशी, शुक्ला यांच्यासह सात उमेदवारांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 20:46 IST

नागपूर महापालिकेच्या धरपमेठ झोन अंतर्गत प्रभाग १२ (ड) या रिक्त झालेल्या एका जागेसाठी ९ जानेवारीला पोटनिवडणूक होत आहे.

ठळक मुद्दे९ जानेवारीला मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेच्या धरपमेठ झोन अंतर्गत प्रभाग १२ (ड) या रिक्त झालेल्या एका जागेसाठी ९ जानेवारीला पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची सोमवारी शेवटची तारीख होती. या निडणुकीसाठी भाजपचे , विक्रम जगदीश ग्वालबंशी व काँग्रेसचे पंकज सुरेंद्र शुक्ला यांच्यासह सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.काही महिन्यापूर्वी भाजपचे नगरसेवक जगदीश ग्वालबंशी यांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या प्रभाग १२ (ड) येथील जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. १६ ते २३ डिसेंबरदरम्यान नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी कालावधी सात उमेदवारी अर्ज आले आहेत. यातअशोक देवराव डोर्लिकर (अपक्ष), विक्रम जगदीश ग्वालबंशी (भारतीय जनता पार्टी), आकाश सुरेश कावळे (आम आदमी पार्टी), पंकज सुरेंद्र शुक्ला (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), रिजवान नसीर खान (काँग्रेस), प्रफुल देवराव गणवीर (भारिप बहुजन महासंघ), युगलकिशोर केसरलालजी विदावत (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्र सादर केले. सर्व उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी मनपा उपायुक्त निर्भय जैन यांच्याकडे नामनिर्देशनपत्र सादर केले. आज मंगळवारी नामनिर्देशनपत्रांची छाननी केली केली जाणार आहे. भाजप व काँग्रेस उमेदवारांत थेट लढत होण्याची शक्यता आहे.विक्रम ग्वालबंशी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महापौर संदीप जोशी, आ. परिणय फुके, मायाताई इवनाते, माजी आ. सुधाकर देशमुख, भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, सत्तापक्षनेते संदीप जाधव, दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, किशन गावंडे, किशोर पालांदूरकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.निवडणूक वेळापत्रकनामनिर्देशन पत्र छाननी - २४ डिसेंबरवैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध - २४ डिसेंबरउमेदवारी अर्ज मागे घेणे - २६ डिसेंबरउमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप - २७ डिसेंबरउमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध - २७ डिसेंबरमतदान दिनांक - ९ जानेवारी २०२०मतमोजणी - १० जानेवारी २०२०

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाElectionनिवडणूक