शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रल मॉलवर मनपाचा ताबा; लिलाव करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:28 IST

मालमत्ताकराची थकबाकी न भरल्याने महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयाने रामदासपेठ येथील सेंट्रल मॉवर जप्तीची नोटीस बजावली. सेंट्रल मॉलने वर्ष २०१३ पासून मालमत्ताकर न भरल्याने थकबाकी ८ कोटी ९६ लाख ३५ हजार ९४४ रुपये झाली आहे. तसेच यावर ९२.९० लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. थकबाकी व दंडाची रक्कम न भरल्यास लवकरच मॉलचा लिलाव केला जाणार आहे.

ठळक मुद्देराष्ट्रभाषा सभेलाही नोटीस : पाच मालमत्ताधारकांकडे ११.६६ कोटींचा कर थकीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मालमत्ताकराची थकबाकी न भरल्याने महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयाने रामदासपेठ येथील सेंट्रल मॉवर जप्तीची नोटीस बजावली. सेंट्रल मॉलने वर्ष २०१३ पासून मालमत्ताकर न भरल्याने थकबाकी ८ कोटी ९६ लाख ३५ हजार ९४४ रुपये झाली आहे. तसेच यावर ९२.९० लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. थकबाकी व दंडाची रक्कम न भरल्यास लवकरच मॉलचा लिलाव केला जाणार आहे.कर विभागाने दिलेल्या माहितीनुसार वॉर्ड क्रमांक ७२ येथील मे.एन.कुमार प्रोजेक्ट अ‍ॅन्ड इंन्फ्रा. प्रा. लिमिटेड च्या सेंट्रल मॉल(ंमालमत्ता क्र.७३६) राष्ट्रभाषा सभा (ंमालमत्ता क्र.११३५/यू / २), डॉ. जेसवानी (घर क्रमांक २४/अ /१०३), वॉर्ड क्रमांक ७४ येथील सुभाष मोतीराम कासूलकर (घर क्रमांक ५०१/५१/अ/२०१) व वॉर्ड क्रमांक ३५ येथील सुनील श्रीराम मानखीकर (घर क्रमांक ९९४) येथे जप्ती नोटीस लावण्यात आलेली आहे. कर न भरल्यास हुकूमनामा प्रकाशित करून मालमत्ता लिलावात काढली जाणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार सेंट्रल मॉलचा वर्ष २०१३-१४ पासून कर भरण्यात आलेला नाही. या मॉलचा वर्षाला १ कोटी ६६ लाख २८हजार ५३५ रुपये इतका कर आहे. तळमजल्यासह तीन मजली ही इमारत १५०९.६ चौरस मीटर क्षेत्रात उभारण्यात आलेली आहे. तर वरील मजले प्रत्येकी १४७४.०७ चौरस वर्ग मीटर क्षेत्र आहे.मॉलमध्ये अनेक शो रूम आहेत. त्यामुळे मॉल सील न करता जप्ती कारवाई करण्यात आली आहे. झोन कार्यालयाने नोटीस लावली होती. सुरक्षा रक्षकाने ती फाडली. याची माहिती झोन कार्यालयाला मिळाली. यासंदर्भाती पोलिसात तक्रार करण्याची तयारी झोन कार्यालयाने दर्शविली आहे. ही कारवार्ट लक्ष्मीनगर झोनचे सहायक अधीक्षक प्रकाश गायधने, कर निरीक्षक धनंजय धुमाल, बाबा श्रीखंडे, संजय कापगते, प्रमोद मोगरे आदींनी केली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर