शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा अनागोंदी कारभार : आरोग्य अधिकाऱ्यांसह १२ अभियंत्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 00:11 IST

हॉटमिक्स विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच झोन स्तरावरील कार्यकारी अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे निर्देश शुक्रवारी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

ठळक मुद्देस्थायी समिती व आयुक्तांची दिशाभूल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरोग्य विभागाचा प्रस्तावित खर्च व्यय पदातून न दर्शविता आय पदातून दर्शविल्याप्रकरणी आरोग्य अधिकारी (स्वच्छता) यांना, तसेच शहरातील नागरिक खड्ड्यामुळे त्रस्त असल्याने स्थायी समितीने निर्देश दिल्यानंतरही खड्ड्याबाबतचा अहवाल सादर केला नाही. यासंदर्भात हॉटमिक्स विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच झोन स्तरावरील कार्यकारी अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे निर्देश शुक्रवारी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी महापालिका प्रशासनाला दिले.महापालिकेच्या अर्थसंकल्पात आय पदांतर्गत उत्पन्न तर व्यय पदांतर्गत खर्च दर्शविला जातो. त्यानुसार विभाग प्रमुख विविध खर्चाच्या फाईल व्यय पदांतर्गत स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर करतात. मात्र आरोग्य विभागाने आय पदांतर्गत खर्चाची फाईल सादर केली. यात स्थायी समिती व आयुक्तांची दिशाभूल केल्याने स्थायी समितीच्या बैठकीत प्रदीप पोहाणे यांनी नाराजी व्यक्त क रून आरोग्य अधिकारी (स्वच्छता)डॉ. सुनील कांबळे यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.शहरातील नागरिक खड्ड्यामुळे त्रस्त आहेत. याचा विचार करता शहरातील रस्ते दुरुस्ती व खड्ड्याबाबत चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीला हॉटमिक्स विभागाचे कार्यकारी अभियंता व झोन स्तरावरील कार्यकारी अभियांना यांनी माहिती सादर करणे अपेक्षित होते. मात्र कार्यकारी अभियंत्यांनी अद्याप माहिती सादर केली नाही यामुळे या सर्वांना नोटीस बजावून स्थायी समितीच्या पुढील बैठकीत अहवाल व खुलासा सादर करण्याचे निर्देश पोहाणे यांनी दिले.२५.५४ कोटींच्या कामांना मंजुरीस्थायी समितीच्या बैठकीत ६.६० कोटींचे प्रशासकीय प्रस्ताव व १८.८४ कोटींच्या विविध कामांच्या निविदा व शासकीय कामांना मंजुरी देण्यात आली. यात सिमेंट काँक्रि ट रोड, पावसाळी नाल्या, रस्ता रुंदीकरण आदी कामांचा समावेश आहे. गेल्या १५ दिवसातील ही स्थायी समितीची तिसरी बैठक असून निवडणूक अचारसंहिता लागू होण्यापूर्वी पुन्हा समितीची बैठक होणार आहे. यात महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका