शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मनपा अर्थसंकल्पाला मोठी कात्री लागणार! नवीन आयुक्त सादर करणार सुधारित अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:40 IST

अर्थसंकल्पातील प्रस्तावित अंदाजानुसार महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होण्याची शक्यता नसल्याचे कारण देत आयुक्तांनी स्थायी समितीच्या बजेटला २५ टक्के कात्री लावली आहे.

ठळक मुद्देकरवसुली उद्दिष्ट अवघड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अर्थसंकल्पातील प्रस्तावित अंदाजानुसार महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होण्याची शक्यता नसल्याचे कारण देत आयुक्तांनी स्थायी समितीच्या बजेटला २५ टक्के कात्री लावली आहे. परंतु अर्थसंकल्पात अपेक्षित ३१९७ कोटींच्या तुलनेत २२ जानेवारीपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत १६६६ कोटींचाच महसूल जमा झाला आहे. पुढील ६६ दिवसात उर्वरित १५३१ कोटींचा महसूल जमा होण्याची शक्यता नाही. मार्च २०२० अखेरपर्यंत फार तर २१०० ते २२०० कोटीपर्यत हा आकडा जाण्याची शक्यता विचारात घेता नवीन आयुक्तांकडून २०१९-२० या वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पात मोठी कात्री लावली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू होत आहेत. ते शुक्रवारी वा सोमवारी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. शिस्तप्रिय व कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे मुुंढे महापालिकेचे वास्तव उत्पन्न विचारात घेऊ न सुधारित अर्थसंकल्प सादर करतील, अशी महापालिका वर्तुळात चर्चा आहे.मिळालेल्या माहितीनुसार स्थायी समितीने वित्त वर्षात ५०० कोटींच्या विकास कामांचे कार्यादेश, निविदा, प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. खर्चाला २५ टक्के कात्री लावल्याने १२५ कोटींची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे . त्यात पुन्हा कात्री वाढली तर स्थायी समितीने जी कामे मंजूर केली आहेत त्यावर परिणाम होईल. उल्लेखनीय म्हणजे फिक्स प्रायोरिटी, दुर्बल घटक व दिव्यांगांसाठी आरक्षित निधी वगळता अन्य बाबीतील निधीला कात्री लावण्यात आली आहे. ज्या शिर्षकात ७५ टक्के कामे मंजूर करण्यात आली आहे अशा शिर्षकात नवीन कामे घेता येणार नाही. ज्या शिर्षकात ७५ टक्केहून अधिक रकमेच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे अशा कामांना ब्रेक लावले आहे. स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी वर्ष २०१९-२० या वर्षाचा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. परंतु मावळत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी आयुक्तांनी कपातीचे पत्र जारी केल्याने अर्थसंकल्पाला २५ टक्के कात्री लावली. वित्त वर्ष अखेरीस महापालिका तिजोरीत फार तर २२०० कोटींचा निधी जमा होईल,असा प्रशासनाचा अंदाज असल्यने कात्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.वसुलीच्या दिवसात उत्पन्नात घटजानेवारी ते मार्च हे तीन महिने कर वसुलीचे असतात. आर्थिक वर्ष संपण्याला ६६ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. वसुलीच्या दृष्टीने या कालावधीत विशेष प्रयत्न होणे अपेक्षित आहे. डिसेंबर महिन्यात मालमत्ता करापासून ४५ कोटी आले होते. मात्र कर्मचारी नसल्याने व डिमांड वाटपाचा घोळ झाल्याने २३ जानेवारीपर्यंत २० कोटी जमा झाले. अखेरच्या तीन महिन्यात वसुली अपेक्षित असताना जानेवारीत कर वसुलीत झालेली घट हा शुभ संकेत नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प