शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बरखास्तीच्या अर्धवट निर्णयामुळे नासुप्रची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 22:02 IST

नागपूर शहरातील अभिन्यास नियमितीकरण करण्याची जबाबदारी महापालिकेकडे सोपविण्यात आल्याने नासुप्रच्या तिजोरीत जमा होणारा महसूल जवळपास बंद झाला आहे. त्यातच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एनएमआरडीए) खर्च नासुप्रला करावा लागत असल्याने नासुप्र प्रशासन कोंडीत सापडले आहे.

ठळक मुद्देनासुप्र अद्याप बरखास्त नाही : उत्पन्न थांबल्याने प्रकल्पांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याला राज्य मंत्रिमंडळाने २७ डिसेंबर २०१६ रोजी तत्त्वत: मान्यता दिली. ऑगस्ट २०१९ मध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परंतु नासुप्रची बरखास्ती, कर्मचाऱ्यांचे समायोजन, कोणत्या मालमत्ता महापालिकेकडे हस्तांतरित होणार आहे, याबाबत शासन निर्णयात स्पष्टता नसल्याने नासुप्र अद्याप बरखास्त झालेली नाही. दुसरीकडे शहरातील अभिन्यास नियमितीकरण करण्याची जबाबदारी महापालिकेकडे सोपविण्यात आल्याने नासुप्रच्या तिजोरीत जमा होणारा महसूल जवळपास बंद झाला आहे. त्यातच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एनएमआरडीए) खर्च नासुप्रला करावा लागत असल्याने नासुप्र प्रशासन कोंडीत सापडले आहे.नागपूर शहरात एकच विकास प्राधिकरण असावे, अशी लोक प्रतिनिधींची मागणी होती. त्यानुसार राज्य शासनाने नासुप्र बरखास्तीचा निर्णय घेतला. परंतु या संदर्भात स्पष्ट दिशानिर्देश देण्यात आलेले नाही. शासन निर्णयामुळे नासुप्रचे काम ठप्प झाले. दुसरीकडे समायोजनाची प्रक्रिया रखडली असल्याने नासुप्र प्रशासन संभ्रमात आहे.नासुप्रच्या मालमत्ता मनपाकडे जाणारप्रन्यासच्या सर्व मालमत्ता, निधी आणि अन्य मालमत्ता, अधिकार आणि उत्तरदायित्व महापालिकेकडे दिले जाणार आहे. प्रन्यासची सोडण्यायोग्य मालमत्ता, निधी, घेणी ही महापालिकेला देण्यात येतील. प्रन्यासचे सोडण्यायोग्य उत्तरदायित्वदेखील महापालिकेकडे येणार आहे. राज्य शासनाने नासुप्र बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. परंतु अभिन्यास नियमितीकरणाशिवाय अन्य कोणत्याही प्रकारचा विभाग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाही.समायोजनाचे स्पष्ट निर्देश नाहीमहाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत नागपूर शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचे अधिकार नासुप्रला होते. राज्य सरकारने नासुप्र बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शहरातील विकास प्राधिकरण म्हणून महापालिकेला याबाबतचे अधिकार देण्यात आले. अधिकार संपुष्टात आल्याने नासुप्रने ऑगस्ट २०१९ पासून भूखंड नियमितीकरणाची प्रक्रिया बंद केली. याबाबतचा संपूर्ण रेकॉर्ड महापालिकेच्या नगररचना विभागाकडे हस्तांतरित केला. परंतु कर्मचारी व अधिकारी यांचे समायोजन करण्यात आलेले नाही.नासुप्रच्या योजना एनएमआरडीएकडेप्रन्यासकडील बहुतांश मोठे प्रकल्प एनएमआरडीएकडे आहेत. ताजबाग सौंदर्यीकरण, दीक्षाभूमी, कोराडी देवस्थान, आरटीओ कार्यालय, पोलीस हाऊसिंग, चिचोलीचा विकास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर आदी योजना एनएमआरडीएकडे सोपविण्यात आलेल्या आहेत.

आस्थापना खचार्साठी अनुदान नाही यामध्ये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला नागपूर महापालिकेप्रमाणे आस्थापना खर्चाकरिता शासनाकडून अनुदान मिळण्याचे प्रावधान नाही. त्यामुळे 'एनएमआरडीए'ला आस्थापना खर्चाचे प्रावधान स्वत: करावयाचे आहे. अभिकरण तत्त्वावर विकासकामे राबविल्यास  एनएमआरडीएला उत्पन्न प्राप्त होणार आहे. परंतु या प्रक्रियेला अद्याप गती मिळाली नसल्याने नासुप्रलाच हा खर्च करावा लागत आहे.हक्क, अधिकार मनपाकडे प्रन्यासला मिळणारे सर्व प्रकारचे भाडे, रक्कम, मालमत्तासंबंधीचे हक्क, अधिकार महापालिकेकडे जातील. शहरातील पूर्ण झालेल्या व पूर्ण होत असलेल्या सर्व विकास योजना महापालिकेला हस्तांतरित करण्यात येतील किंवा सरकारच्या निर्देशानुसार मेट्रोकडे हस्तांतरित होतील. प्रन्यास वा अधिकाऱ्यांच्या विरोधातील न्यायालयात असलेल्या सर्व याचिका, दिवाणी आणि फौजदारी याचिका महापालिकेशी संबंधित राहतील.

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास