शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

नितीनजी, सेहत का ख्याल रखिए ! राजनाथसिंह यांनी केली गडकरींची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 21:22 IST

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापनदिन कार्यक्रमाप्रसंगी भोवळ आल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी सायंकाळी नागपुरात परतले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

ठळक मुद्देनागपूर विमानतळावर झाली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापनदिन कार्यक्रमाप्रसंगी भोवळ आल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी सायंकाळी नागपुरात परतले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तुमच्या कामाचा धडाका संपूर्ण देश पाहत आहे. मात्र तुम्ही आपल्या तब्येतीचीदेखील काळजी घेत जा, असा आपुलकीचा सल्ला यावेळी राजनाथसिंह यांनी गडकरी यांना दिला. दरम्यान, गडकरी सुखरुप असल्याचे पाहून त्यांच्या हितचिंतकांचा जीव भांड्यात पडला.सोलापूर विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नितीन गडकरी यांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती कळली अन् कार्यकर्त्यांच्या छातीतच धस्स झाले. ‘आॅल इज वेल’ असल्याचे वृत्त येत असले तरी मनात काळजी कायम होती. आपल्या नेत्याला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांना चैन पडणारच नव्हते. गुरुकुंज मोझरी येथे भाजपाच्या महाजनादेश यात्रेसाठी आलेल्या राजनाथसिंह यांनादेखील ही माहिती मिळाली होती. मोझरीहून नागपूर विमानतळावर आल्यानंतर राजनाथसिंग यांना काही वेळातच नितीन गडकरी हे सोलापूरहून येणार असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी काही वेळ प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला. नितीन गडकरी विमानातून उतरल्यावर विमानतळावरच दोघांची भेट झाली. यावेळी राजनाथसिंह यांनी गडकरी यांची आस्थेने चौकशी केली.माझी प्रकृती स्थिर : गडकरीकार्यक्रमादरम्यान भोवळ आल्यानंतर गडकरी यांची सोलापूर येथेच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सर्व तपासण्या ‘नॉर्मल’ आढळून आल्या. नागपूर विमानतळावर आल्यानंतर गडकरींनी माझी प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले व त्यांच्या हितचिंतकांमधील तणाव दूर झाला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीHealthआरोग्यRajnath Singhराजनाथ सिंह