शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Gadkari vs Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनर्विचार अर्ज खारीज

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: September 30, 2022 16:59 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धचे प्रकरण

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेमधील काही वादग्रस्त परिच्छेद वगळण्याच्या आदेशावर पुनर्विचार व्हावा, याकरिता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेला अर्ज बेकायदेशीर ठरवून खारीज करण्यात आला. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.

संबंधित निवडणूक याचिका पटोले यांनीच दाखल केली आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भ्रष्ट व्यवहार केल्यामुळे गडकरी यांची निवड रद्द करण्यात यावी, असे पटोले यांचे म्हणणे आहे. तसेच त्यांनी स्वत:ला विजयी घोषित करण्याची मागणीही निवडणूक याचिकेत केली आहे. उच्च न्यायालयाने १७ डिसेंबर २०२१ रोजी गडकरी यांचा एक अर्ज अंशत: मंजूर करून या निवडणूक याचिकेतील काही निरर्थक व अवमानजनक परिच्छेद वगळण्याचा पटोले यांना आदेश दिला. पटोले यांचा त्या आदेशावर आक्षेप होता. पटोले यांच्यातर्फे ॲड. रवी जाधव व ॲड. शादाब खान तर, गडकरी यांच्यातर्फे वरिष्ठ ॲड. सुनील मनोहर यांनी कामकाज पाहिले.

असे होते वादग्रस्त परिच्छेदातील मुद्दे

गडकरी यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये धापेवाडा येथील जमिनीविषयी योग्य माहिती दिली नाही. २०१३-१४ मधील इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये प्रत्यक्ष ९ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असताना केवळ २ लाख ६६ हजार ३९० रुपये उत्पन्न दाखवले. २०१४-१५ मध्ये १७ लाख १० हजार रुपये वार्षिक उत्पन्न असताना केवळ ६ लाख १ हजार ४५० रुपये उत्पन्न दाखवले. २०१५-१६ मध्ये ८ लाख ७ हजार ३०० रुपये, २०१६-१७ मध्ये ७ लाख ६५ लाख ७३० रुपये तर, २०१७-१८ मध्ये ६ लाख ४० हजार ७०० रुपये एवढे कमी उत्पन्न दाखवले असे विविध मुद्दे वादग्रस्त परिच्छेदांमध्ये होते.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयNana Patoleनाना पटोलेNitin Gadkariनितीन गडकरी